Ukraine in UNSC 
ग्लोबल

'ते थेट नरकात जातात', युक्रेन-रशिया UN च्या बैठकीतही एकमेकांना भिडले

सकाळ डिजिटल टीम

बुधवारी रात्री उशिरा संयुक्त राष्ट्राची आपत्कालीन बैठक झाली. यावेळी युक्रेन आणि रशियाचे राजदूत हे समोरा समोर आले.

ओटावा - रशिया युक्रेन संकटावर बुधवारी रात्री उशिरा संयुक्त राष्ट्राची आपत्कालीन बैठक झाली. यावेळी युक्रेन आणि रशियाचे राजदूत हे समोरा समोर आले. युक्रेनचे (Ukraine) राजदूत सर्गीय आणि रशियाचे (Russia) राजदूत वासिली यांच्यात संवादही झाला. युक्रेनच्यावतीने हे युद्ध थांबवण्याची विनंती करण्यात आली. यावेळी भावूक झालेल्या युक्रेनच्या राजदूतांनी म्हटलं की,'युद्ध थांबवणं ही या विभागांची जबाबदारी आहे.' १५ सदस्यांची ही बैठक रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमध्ये लष्करी मोहिमेची घोषणा केल्यानंतर सुरु झाली होती.

युक्रेनच्या राजदूतांनी सुरक्षा परिषदेत सांगितलं की,'रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केलीय. जर रशियाचे राजदूत उत्तर देण्याच्या मनस्थितीत नसतील तर त्यांनी सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद सोडावं. पुतीन किंवा परराष्ट्र मंत्र्यांना बोलवा आणि हा आक्रमकपणा बंद करा.'

'युद्धातील गुन्हेगारांसाठी कोणती शिक्षा नाही, ते थेट नरकात जातात', अशा शब्दात युक्रेनच्या राजदूतांनी सुनावलं. रशियाच्या राजदूतांकडून युक्रेनला मात्र मोजक्यात शब्दात प्रतिसाद दिला गेला. रशियाचे राजदूत वासिली म्हणाले की,'एक विशेष लष्करी मोहिम आम्ही करत आहे, याला युद्ध म्हणता येणार नाही.'

रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. या हल्ल्याचे आदेश रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिले आहेत आणि क्रिमीयामार्गे युक्रेनमध्ये रशियन सैन्य घुसत आहे. रशियाने युक्रेन लष्कराला शस्त्रे खाली ठेवा आणि मागे जा असा इशारा दिला आहे. दुसरीकडे रशियाकडून हल्ले केले जात असून त्याला युक्रेनकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. लुहान्स्क प्रांतात रशियाची पाच विमाने आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT