Russia-Ukraine Sakal
ग्लोबल

चिथावणीला बळी पडणार नाही : युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की

युक्रेनच्या पूर्व सीमेवर गेल्या तीन दिवसांपासून सैन्य आणि बंडखोर यांच्यात सुरु असलेल्या संघर्षात युक्रेनच्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

म्युनिच : ‘युद्ध करण्यासाठी आम्हाला कितीही चिथावणी दिली गेली तरी आम्ही त्याला बळी पडणार नाही. तसेच, रशियाकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याचा सामना करण्यास आम्ही सक्षम आहोत,’ असे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी आज स्पष्ट केले. युक्रेनच्या पूर्वेकडील सीमेवर रशिया पुरस्कृत बंडखोरांनी केलेल्या रॉकेट हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी म्युनिच येथे सुरु असलेल्या सुरक्षा परिषदेत आपली ठाम भूमिका मांडत पाश्‍चिमात्य देशांनाही आवर घालण्याचा प्रयत्न केला. (Russia Ukraine)

युक्रेनच्या पूर्व सीमेवर गेल्या तीन दिवसांपासून सैन्य आणि बंडखोर यांच्यात सुरु असलेल्या संघर्षात युक्रेनच्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाकडून युक्रेनवर आक्रमण होणार असल्याचा अमेरिकेचा आरोप आणि रशियाने केलेला इन्कार या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी सर्व देशांना संयम बाळगण्याचे आणि अधिक तणाव निर्माण न करण्याचे आवाहन केले. झेलेन्स्की म्हणाले,‘‘रशियाच्या संभाव्य आक्रमणाच्या पार्श्वभूमीवरही आम्ही भयभीत झालेलो नाही, आम्हाला आमचे सर्वसामान्य आयुष्य जगायचे आहे. पाश्‍चिमात्य देशांनी रशियाला लक्ष्य करण्यासाठीचे कारण शोधू नये. युक्रेनला सुरक्षेबाबत खात्री द्यावी.’’

पुतीन यांच्याबरोबर चर्चा करणार

एका बाजूला सीमेवरील तणाव आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेकडून वारंवार मिळणाऱ्या सावधगिरीच्या सूचना, यामुळे शांततेचा आग्रह धरणारे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेस्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्याशी थेट चर्चा करण्याची मागणी केली. ‘सध्याच्या तणावाच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी चर्चा आवश्‍यक आहे. पुतीन यांना भेटण्याची इच्छा आहे की नाही, माहिती नाही; मात्र त्यांनी भेटून चर्चा करावी, असे आवाहन मी करतो आहे,’ असे झेलेन्स्की यांनी जाहीर केले आहे. पुतीन यांना सोयीच्या असलेल्या कोणत्याही ठिकाणी भेटण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शांततेसाठी युक्रेनला केवळ राजनैतिक मार्गानेच तोडगा हवा आहे, असे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले. यास रशियाकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.

युक्रेनवर हल्ला करण्यासाठीची पार्श्वभूमी रशिया तयार करत आहे. मात्र, रशियाने असे केल्यास त्याचे होणारे परिणाम त्यांना तातडीने भोगावे लागतील.

- कमला हॅरिस, उपाध्यक्षा, अमेरिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माफी नंतरही वाद शमेना! धीरेंद्र शास्त्रींची शिवभक्त असल्याचं दाखवण्याची धडपड, शिवरायांचे चित्र असलेला सदरा केला परिधान

Shivaji University Hostel food issue : शिवाजी विद्यापीठ वसतिगृहातील जेवणात अळ्या, किडे; शिवसेना आक्रमक, वारंवार घटनेने विद्यार्थ्यांची हेळसांड

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, लोकल २० मिनिटे उशिरा

UP Police: एक लाख पोलिसांची मेगाभरती! CM योगींची मोठी घोषणा; एकाच वर्षात लाखो तरुणांना मिळणार खाकी वर्दीची संधी!

Shiroli Assault Case Update : शिरोली अत्याचारप्रकरणाला नवं वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यास रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याचा प्रकार; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT