Russia ukraine war  Sakal
ग्लोबल

Russia-Ukraine War Live: कीव्हच्या वायव्य भागातील लढाई जोरात सुरु

सकाळ डिजिटल टीम

युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा आज चौदावा दिवस आहे. या युद्धामध्ये युक्रेनचं अतोनात नुकसान झालेलं असून इतर देशही अनेक अर्थाने अडचणीत आलेले आहेत. या युद्धाच्या दुरगामी झळा संपूर्ण जगाला बसणार आहेत, यात शंका नाहीच. मात्र, सध्या युक्रेनमध्ये अनेक देशांचे विद्यार्थी आणि नागरिक देखील अडकले असल्याने सर्वांत मोठी चिंता ती आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या नागरिकांना युक्रेनमधून सोडवून आणण्यासाठी भारतही प्रयत्नशील आहे. या युद्धासंदर्भातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त 'सकाळ'वर...

  • पूर्व युक्रेनमधील सेवेरोडोनेस्तक शहरात झालेल्या रशियाच्या लष्करी हल्ल्यात किमान 10 लोक ठार झाले आहेत. एएफपीने स्थानिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

  • खार्किव्ह, चेर्निहाइव्ह, सुमी आणि मारियुपोल ही शहरे रशियन सैन्याने वेढलेली राहिली असून मोठी धुमश्चक्री सुरु आहे.

  • कीव्हच्या वायव्य भागातील लढाई अद्यापही चालूच आहे. यामध्ये रशियन सैन्य कोणत्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण यश मिळवण्यात अद्याप तरी अपयशी ठरले आहे.

  • बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनमधून आपल्या 9 नागरिकांची सुटका केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. या कारवाईत नेपाळी, ट्युनिशियाच्या विद्यार्थ्यांचीही सुटका करण्यात आली आहे.

  • झायटोमिर आणि खार्किवमधील निवासी इमारतींवर हवाई हल्ले करण्यात आले असून यामध्ये 3 मुलांसह 7 जण ठार

  • पेप्सिकोने रशियामधील पेप्सी-कोला आणि इतर पेयांचे उत्पादन आणि विक्री स्थगित केली आहे.

  • या युद्धात किती जण मारले गेले आहेत याबाबतची अचूक संख्या अज्ञात आहे. मात्र, तरीही युक्रेन आणि संयुक्त राष्ट्रांनी असा अंदाज लावला आहे की या लढाईत हजारो रशियन सैन्य आणि नागरिक मारले गेले आणि बरेच जण जखमी झाले आहेत.

  • युनायटेड नेशन्सच्या मानवाधिकार कार्यालयाने सांगितलंय की, त्यांनी युक्रेनमध्ये आतापर्यंत 1,335 नागरिकांच्या मृत्यूची पडताळणी केली असून यामध्ये 474 ठार आणि 861 जखमी आहेत, परंतु खरा आकडा जास्त असण्याची शक्यता आहे.

  • युक्रेनने म्हटलंय की, त्यांच्या सैन्याने 11,000 हून अधिक रशियन सैनिकांना ठार केले आहे. रशियाने सुमारे 500 मृतांची पुष्टी केली आहे. दोन्ही बाजूंनी युक्रेनच्या जीवितहानीबद्दल खुलासा केलेला नाही.

  • कोका-कोला कंपनीने रशियामधील आपला व्यवसाय स्थगित केला आहे. यावेळी कोका-कोलाने म्हटलंय की, "आमचं अंतःकरणं त्या लोकांसोबत आहे, जे युक्रेनमधील या दुःखद घटनांचे भयानक परिणाम सहन करत आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT