16 भारतीय विद्यार्थी हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्ट या शहरात सुरक्षित  sakal
ग्लोबल

Russia-Ukraine : आम्हाला तात्काळ भारतात न्या !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विद्यार्थ्यांची विनवणी

संतोष कणसे

कडेगाव:  यूक्रेनच्या खारकिव्ह शहरातुन आपला जीव मुठीत घेऊन बाहेर पडलेले शिवांजली यादव व ऐश्वर्या पाटील यांचेसह 16 भारतीय विद्यार्थी हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्ट या शहरात सुरक्षित पोहोचले आहेत.तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथून आम्हाला तातडीने मायदेशात न्यावे अशी आर्त विनवणी ऐश्वर्या पाटील व शिवांजली यादव यांनी केली आहे.

यूक्रेनच्या खारकिव्ह शहरातुन हंगेरी

बॉर्डरच्या दिशेने निघालेले शिवांजली यादव व ऐश्वर्या पाटील यांच्यासह 16 भारतीय विद्यार्थी तब्बल 1 हजार 550 कि.मी अंतराच्या रेल्वे प्रवासानंतर आता हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्ट या शहरात सुरक्षित पोहोचले आहेत.कडेगाव तालुक्यातील कडेपुर येथुल शिवांजली दत्तात्रय यादव व हिंगणगाव खुर्द येथील ऐश्वर्या सुनील पाटील या दोघी एमबीबीएस शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील खारकिव्ह शहरात आडकल्या होत्या.मात्र रशियाचे हल्ले तीव्र झाल्याने त्यांच्यासह 16 भारतीय विद्यार्थ्यांनी धाडसाने खारकिव्ह शहर सोडले आणि जीव मुठीत घेऊन हंगेरीत पर्यंतचा चित्तथरारक प्रवास केला.हे विद्यार्थी हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्ट शहरात पोहचले. आम्ही सुरक्षित बुडापेस्ट शहरात सुरक्षित पोहोचलो आहे असे शिवांजली यादव व ऐश्वर्या पाटील यांनी सांगितले.

ऐश्वर्या व शिवांजली म्हणाल्या,खारकिव्ह येथून मंगळवारी (ता.1) सकाळी जीव मुठीत घेऊन आम्ही बाहेर पडलो.खारकिव्ह मधून रेल्वेने प्रवास करीत असताना युक्रेनची राजधानी असलेल्या किव्ह पासून पुढे जाई पर्यंत भीतीचे वातावरण होते.रशियाकडून युक्रेन मधील खारकिव्ह आणि राजधानी असलेल्या किव्ह शहरावर हल्ले सुरू आहेत अशा स्थितीत किव्ह शहरातून रेल्वे पुढे जाईपर्यंत मनात खूप भीती होती.आकाशातून घिरट्या घालणारी विमाने आणि बॉम्ब वर्षावाचे कानठळ्या बसणारे आवाज ऐकून अंगाचा थरकाप उडत होता.

मात्र आम्ही एकमेकांना दिलासा देत धाडसाने तो चित्तथरारक प्रवास करीत होतो.मंगळवारी सायंकाळी लिव्ह रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचल्यावर तेथे उतरून या काही तास पुढील रेल्वेची प्रतीक्षा करीत होतो.लिव्ह मध्येही हल्ले सुरू होते त्यामुळे भीती कायम

होती.तेथून काही वेळाने दुसऱ्या रेल्वेने युक्रेनमधील चॉप शहराकडे प्रवास सुरु केला आणि आम्हाला दिलासा मिळाला.चॉप रेल्वे स्थानकात उतरल्यावर थोडेसे सुरक्षित वातावरण वाटले.तेथे पोहोचल्यावर आम्हाला मोफत जेवण व पाणी आदी सुविधा मिळाल्या.बुधवारी (ता.2) रात्री तेथून हंगेरीच्या बुडापेस्टकडे जाणाऱ्या रेल्वेने निघालो.युक्रेनमधील चॉप शहरापासून 245 कि.मी.अंतरावर

हंगेरी बॉर्डरवर रेल्वे पोहचल्यावरच

आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला.रात्री उशिरा बुडापेस्ट या शहरात आम्ही पोहोचलो.बुडापेस्टमध्ये

आम्हाला जेवण पाणी आदी सुविधा

मिळाल्या आहेत.आता आम्ही भारतीय दूतावास व भारत सरकारच्या मदतीने सुरक्षित मायदेशी पोहोचणार आहोत.परंतु आमच्या पाठीमागून येथे आलेली काही मुले मायदेशी भारतात पोहोचली आहेत. परंतु आम्हांला अजूनही भारतात जाण्यासाठी येथून सूचना मिळत नाहीत.तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हंगेरीची राजधानी बुडापेस्ट मधून आम्हाला तातडीने मायदेशात न्यावे अशी आर्त विनवणी ऐश्वर्या पाटील व शिवांजली यादव यांनी केली आहे.

हंगेरी : यूक्रेनच्या खारकिव्ह शहरातून हंगेरी येथे पोहोचल्यानंतर ऐश्वर्या पाटील व शिवांजली यादव यांचेसह भारतीय विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकत सेल्फी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT