Couple Sakal
ग्लोबल

Russia Ukraine: लग्नानंतर काही तासातच मायभूमीसाठी घेतली हातात शस्त्रे

हातात शस्त्र घेऊन देशाचं संरक्षण करता करता आपल्या लग्नाची पहिला रात्र या जोडप्यानं घातली आहे.

दत्ता लवांडे

रशिया आणि युक्रेन वाद सध्या शिगेला पोहचला असून रशियाच्या जोरदार माऱ्याच तेवढ्याच क्षमतेने युक्रेनकडून प्रतिकार सुरु आहे. कालच्या बॉम्बहल्ल्यात युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थाचा मृत्यू झाला असून काही युक्रेनचे नागरिकसुद्धा मरण पावले आहेत. या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याकडून सैन्याला धीर देण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांनी नागरिकांनासुद्धा शस्त्र हाती घेण्याचं आवाहन केलं आहे.

युरोपीय देशांकडून रशियाची गळचेपी करण्यासाठी प्रयत्न सुरु असून अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध टाकले आहेत. तसेच अनेक नागरिकांनी रशियाविरुद्ध लढण्यासाठी शस्त्र हाती घेतले आहेत.

युक्रेनच्या नुकत्याच लग्न झालेल्या एका जोडप्याला हातात बंदूक घेऊन लढायची वेळ आली आहे. यारीना अरिएवा आणि स्वियातोस्लाव फुरसिन असं या जोडप्याचं नाव असून त्यांनी आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी शस्त्र हाती घेतलं आहे. त्यांचं मे महिन्यात लग्न होणार होतं पण रशियाने आक्रमण केल्यावर त्यांनी राजधानी कीव येथे आपल्या लग्नाची गाठ बांधली.

लग्नाच्या काही तासानंतर त्यांनी रायफल आणि जॅकेट परिधान करुन आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. हातात शस्त्र घेऊन देशाचं संरक्षण करता करता आपल्या लग्नाची पहिली रात्र व्यतीत करणार असल्याचं त्यांनी एका माध्यमाला बोलताना सांगितलं.

"सध्या देशात चाललेलं वास्तव सांगणं कठीण आहे." असं नवीन लग्न झालेली अरिवा म्हणाली. पुढे बोलताना ती म्हणाली की, "आज वसंत ऋतूचा पहिला दिवस आहे. या दिवशी लोकं युक्रेनचं राष्ट्रीय फूल असलेल्या सूर्यफूलाची पेरणी करतात. त्याऐवजी ते आता आपल्या मायभूमीच्या रक्षणासाठी शस्त्र हातात घेऊन हल्ल्याचा प्रतिकार करतील." असं ती बोलताना म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT