Russia-Ukraine on food grain exports Istanbul sakal
ग्लोबल

धान्य निर्यातीसाठी रशिया-युक्रेन चर्चा

युद्ध थांबविण्यासाठी शांतता चर्चा होण्याची सध्या शक्यता दिसत नसताना युक्रेनमध्ये निर्यातीविना पडून राहिलेले धान्य जागतिक बाजारपेठांमध्ये पाठविण्यासाठी आज रशिया आणि युक्रेन यांच्यात सरकारपातळीवर चर्चा

सकाळ वृत्तसेवा

इस्तंबूल : युद्ध थांबविण्यासाठी शांतता चर्चा होण्याची सध्या शक्यता दिसत नसताना युक्रेनमध्ये निर्यातीविना पडून राहिलेले धान्य जागतिक बाजारपेठांमध्ये पाठविण्यासाठी आज रशिया आणि युक्रेन यांच्यात सरकारपातळीवर चर्चा झाली. तुर्कियेमधील इस्तंबूल येथे ही चर्चा झाली. युक्रेन आणि रशिया हे दोन्ही मोठे धान्य उत्पादक देश असून युरोप आणि आफ्रिका खंडात या देशांमधून गहू, मका आणि सूर्यफुल तेलाची निर्यात होते. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे युक्रेनमध्ये उत्पादित झालेले लाखो टन धान्य गोदामांमध्ये पडून आहे. युक्रेनच्या दक्षिणेकडील काळ्या समुद्रातून मोठ्या प्रमाणावर निर्यात होते.

मात्र, सध्या येथे रशियाच्या युद्धनौका तैनात असून त्याद्वारे किनाऱ्यावर बाँबवर्षाव केला जात आहे. त्यामुळे व्यापारी जहाजे या भागातून जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे आफ्रिकेत मोठ्या प्रमाणवर अन्नटंचाई निर्माण झाली आहे. या समस्येतून तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ही चर्चा आयोजित केली आहे. रशियाने जहाजे हटविल्याशिवाय निर्यात सुरु करणार नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे तर, युक्रेनने किनारपट्टीवर प्रचंड प्रमाणात पेरलेले भूसुरूंग काढल्याशिवाय जहाजे हटविणार नाही, असे रशियाचे म्हणणे आहे. यातून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न आजच्या चर्चेत झाला.

शस्त्रसाठा लक्ष्य किव्ह

रशियाला प्रत्युत्तरासाठी युक्रेन सैन्यानेही देशाच्या दक्षिण भागातील रशियाच्या शस्त्रसाठ्यावर बाँबहल्ले करत ते उद्‌ध्वस्त केले. रशियाच्या ताब्यात असलेल्या नोव्हा काखोव्हका या भागात रशियाने काही ठिकाणी शस्त्रे आणि दारूगोळा साठवून ठेवले आहेत. या साठ्यांवर युक्रेनी सैनिकांनी रॉकेट लाँचरद्वारे अचूक हल्ले केले. हे रॉकेट लाँचर युक्रेनला अमेरिकेने पुरविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: ‘मयंकला न्याय मिळालाच पाहिजे’; आरोपीला फाशीची शिक्षा द्या, कुटुंबीयांची आर्त मागणी

Taratala Warehouse Shed: मोठी दुर्घटना! तारातालामध्ये गोदामाचा शेड अचानक कोसळला; ५ जणांचा मृत्यू, ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली दबले

Gadchiroli: लष्करात ट्रेनिंगनंतर पहिल्या ड्युटीवर जाण्याआधीच काळाचा घाला; पहाटे धावायला गेल्यावर टेम्पोची धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; देहेन गावाजवळील बंधाऱ्याला भगदाड

'देऊळ बंद २ ने राजा शिवाजीचा रेकॉर्ड मोडू नये' प्रवीण तरडे सिनेमाबद्दल बोलताना म्हणाले...

SCROLL FOR NEXT