Russia-Ukraine tribute War UN Security Council on the anniversary of the Ukraine war sakal
ग्लोबल

Russia Ukraine War : श्रद्धांजलीवरून रशिया-युक्रेन आमनेसामने

युक्रेन युद्धाच्या वर्षपूर्तीनिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत वाक्‌युद्ध

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा परिषदेत रशिया आणि युक्रेन आमनेसामने आले. युद्धाच्या वर्षपूर्तीनिमित्त मृतांना श्रद्धांजली वाहण्यावरून शब्दयुद्धही झडले. वक्त्यांच्या यादीत युक्रेनच्या प्रतिनिधीचा क्रम आधी होता. यावरून रशियाने जाब विचारला. तेथेच वादाची ठिणगी पडली. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमीत्रो क्युलेबा यांना प्रारंभी संधी मिळाली.

ते म्हणाले की, या रशियामुळे बळी पडलेल्यांविषयी आपण आज या दुर्दैवी दिनी अखेर शोक व्यक्त करतो आहोत. एक मिनीट स्तब्धता पाळून सर्वांनी श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती मी करतो.

त्यानंतर क्युलेबा आणि त्यांच्यासह सर्व उपस्थितांनी उभे राहून स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर क्युलेबा बसतात तोच रशियाचे संयुक्त राष्ट्रांवरील राजदूत वॅसिली नेबेन्झीया उभे राहिले. युक्रेनमध्ये २०१४ पासून जे काही घडले आणि त्यात मृत्यमुखी पडले अशा सर्वांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण उभे राहात आहोत आणि स्तब्धता पाळत आहोत.

यातील २०१४ तसेच सर्वांनी असे दोन शब्द संघर्षास युक्रेन जबाबदार असल्याच्या रशियाच्या दाव्याची पुष्टी करणारे होते. त्यावर्षी रशियाशी मित्रत्वाच्या संबंधांचा पुरस्कार करणारे युक्रेनचे तत्कालीन अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांना सामुहिक निदर्शनांमुळे पायउतार व्हावे लागले.

यास प्रत्यूत्तर देताना रशियाने क्रिमीया द्विपकल्पावर ताबा मिळविला. त्यानंतर रशियन भाषकांचे प्राबल्य असलेल्या दोन्बास विभागात घुसखोरीला चिथावणी देण्यात आली. रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील त्या विभागावर अवैधरीत्या ताबा मिळविला आहे.

रशियाच्या आवाहनाला थंडा प्रतिसाद

युक्रेनमधील २०१४ पासूनच्या घडामोडींचा संदर्भ रशियाचे प्रतिनिधी नेबेन्झिया यांच्या वक्तव्याला होता. ते म्हणाले की, सर्वांचे जीव अनमोल आहे आणि म्हणूनच आपण सर्वांच्याच स्मृतीप्रित्यर्थ उभे राहात आहोत. त्यानंतर नेबेन्झिया आणि रशियन राजनैतिक अधिकारी उभे राहिले.

त्यानंतर सभागृहातील इतर सदस्य काही मिनिटांनी थोडा विचार करून हळू-हळू एक-एक करून उभे राहिले. प्रत्येक जण उभा राहिल्यानंतर सुमारे एक मिनीट स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT