Joe-Biden sakal
ग्लोबल

Russia-Ukraine : अमेरिका लादणार भारतावर निर्बंध?

अध्यक्ष ज्यो बायडेन यांना अधिकार

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन: रशियाकडून एस -४०० क्षेपणास्त्र संरक्षक प्रणाली खरेदी केल्याने भारतावर ‘काउंटरिंग अमेरिकाज ॲडव्हरसरिज थ्रू सॅंक्शन ॲट’अंतर्गत (सीएएटीएसए) निर्बंध लागू करायचे की नाही यावर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन हे निर्णय घेतील, अशी माहिती बायडेन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अमेरिकेच्या संसदेतील प्रतिनिधींना बुधवारी (ता.२) दिली.

इराण, उत्तर कोरिया अथवा रशिया या देशांबरोबर महत्त्वाचे व्यवहार करणाऱ्या कोणत्याही देशाविरुद्ध ‘सीएएटीएसए’ कायद्यानुसार प्रतिबंध लावण्याचे अधिकार अमेरिकेला आहे. ‘सीएएटीएसए’ हा अमेरिकेचा कठोर कायदा आहे. रशियाने २०१४ मध्ये क्रिमियावर ताबा घेतल्यानंतर आणि २०१६ मधील अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या कथित हस्तक्षेपानंतर हा कायदा अमेरिकेत अस्तित्वात आला.

भारत आमच्यासाठी महत्त्वाचा

‘‘भारत हा आमच्यासाठी संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा भागीदार आहे. पुढे जाण्यापूर्वी आम्ही या भागीदारीचा आदर बाळगू. रशियाला ज्याप्रमाणे कडक टीकेचा सामना करावा लागत आहे, त्यातून भारत बोध घेईल व रशियाशी अंतर राखण्‍याची वेळ आली आहे, हे त्यांच्या लक्षात येईल, अशी मला आशा आहे,’’ असेही ते म्हणाले. रशियाच्या बँकांवर लावलेल्या निर्बंधामुळे कोणत्याही देशाला रशियाकडून प्रमुख शस्त्र प्रणाली खरेदी करणे खूप कठीण होणार आहे, असा दावा करीत लू म्हणाले की गेल्या काही आठवड्यांत भारताने मिग-२९ विमाने, रशियाची हेलिकॉप्टर आणि रणगाडाभेदी शस्त्रांची नोंदणी रद्द केल्याचे आम्ही पाहिले आहे.

ठळक घडामोडी

  • खारकिव्हमधील बाँबहल्ल्यात युरोपीय संघटनेच्या सदस्याचा मृत्यू

  • युक्रेनच्या दोन टक्के जनतेचे स्थलांतर; संख्या ४० लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज

  • युक्रेनमधील दोन बंदरांवर रशियाचा ताबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT