russia ukraine war crisis Action Western policy Vladimir Putin Moscow sakal
ग्लोबल

"...म्हणून युक्रेनवर हल्ला करावा लागला"; पुतिन यांचं युद्धाला समर्थन

युक्रेनवरील हल्ला : अध्यक्ष पुतीन यांच्याकडून हल्ल्याचे समर्थन

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को : रशियाच्या ‘विजय दिना’च्या कार्यक्रमात अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी अमेरिका आणि युरोपमधील देशांवर तोफ डागली. पाश्‍चिमात्य देशांच्या धोरणांमुळेच युक्रेनवर लष्करी कारवाई करणे भाग पडले, असा दावा पुतीन यांनी केला. तसेच त्यांनी सध्याच्या युद्धाची तुलना नाझी जर्मनीविरोधातील युद्धाबरोबर करत युक्रेनवरील आक्रमणाचे समर्थन केले.

दुसऱ्या महायुद्धात रशियाने नाझी जर्मनीवर मिळविलेल्या विजयाची आठवण म्हणून नऊ मे हा दिवस रशियात ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. या वेळी पुतीन म्हणाले,‘‘आमच्या देशाच्या सीमेवरच धोका निर्माण होऊ देणे आम्हाला अमान्य आहे. त्यामुळेच युक्रेनवर अत्यंत योग्य वेळी आणि आवश्‍यकच असलेली कारवाई केली. कारवाईचा हा निर्णय सार्वभौम, सामर्थ्यशाली आणि स्वतंत्र देश म्हणून आम्ही घेतला. पाश्‍चिमात्य देशांच्या धोरणांमुळेच आम्हाला युक्रेनवर कारवाई करणे भाग पडले.’’ ‘नाटो’ संघटनेने विस्तारवादी धोरणाला वेसण घालावी आणि सुरक्षेची हमी द्यावी, या रशियाच्या मागण्याय मान्य न झाल्यानेच कारवाई करण्याशिवाय रशियाला पर्याय राहिला नव्हता, असा दावा पुतीन यांनी केला. रशियाच्या संरक्षणासाठी आमचे सैनिक युक्रेनमध्ये लढत असल्याचेही ते म्हणाले.

युद्धाच्या आघाडीवर

  • पूर्व युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रांच्या साह्याने तीव्र हल्ल्याचा इशारा

  • विजय दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी युक्रेनी नागरिकांवर बळजबरी

  • रशियाकडून तेल आयात टप्प्याटप्प्यांत कमी करणार : जपान

मोठ्या हानीची शक्यता व्यक्त रशियाकडील अचूक हल्ला करणारी क्षेपणास्त्रे संपत चालली असल्याने ते रॉकेट आणि बाँबचा अधिकाधिक वापर करत आहेत. हे रॉकेट हल्ले लक्ष्याधारित नसल्याने त्यांच्यामुळे अधिक नुकसान होऊ शकते, असा इशारा ब्रिटिश लष्कराने दिला आहे. युक्रेनमधील युद्ध रशियाच्या अपेक्षपेक्षा फारच लांबल्याने त्यांच्याकडील शस्त्रसाठा कमी होत असल्याचा ब्रिटनचा दावा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : ताशी १८० किमी वेगाने धावली वंदे भारत ट्रेन, इंजिनमध्ये ठेवलेल्या ग्लासातून एक थेंबही पाणी सांडले नाही, पाहा व्हिडिओ

Leopard Viral Video : गाईला बघून घाबरला बिबट्या, सीसीटीव्ही फुटेज पाहून म्हणाल; कोल्हापुरी नाद खुळा...

Latest Marathi Live Update News: आयटी दांपत्य फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई? आरोपींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता

Video Viral: किंग्स चार्ल्ससोबत फोटो नाही मिळाला अन् तेव्हाच निर्धार केला... वर्ल्ड कप विजेत्या प्रशिक्षक अमोल मुझूमदारने सांगितला पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रेरणादायी किस्सा

प्रणित मोरे आज बिग बॉसच्या घरात येणार? BB19 बाबत मिळाले नवीन मोठे अपडेट्स, तब्येत सुधारणा झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT