Russia Ukraine War  sakal
ग्लोबल

Russia Ukraine War : चर्चेतूनच युद्ध थांबेल

युक्रेनच्या शहरांवरील हल्ले सुरूच

सकाळ वृत्तसेवा

लव्हिव: रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाला आज वेगळे वळण मिळाले. दोन्ही देशांमधील चर्चेला आज तुर्कस्तानमधील इस्तंबूल शहरात सुरूवात झाली. या द्विपक्षीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनीही नरमाईची भूमिका घेत तटस्थ राहण्याची तयारी दर्शविली असून विनाविलंब शांततेच्या सुरक्षेची हमीही त्यांनी देऊ केली आहे. हे युद्ध संपवायचे असेल तर रशियन नेत्यांनी समोरासमोर बसून चर्चा करायला हवी, केवळ याच माध्यमातून हा संघर्ष मिटू शकतो असे स्पष्ट मत झेलेन्स्की यांनी मांडले. दरम्यान एकीकडे शांततेसाठी चर्चा सुरू झाली असताना युक्रेनवरील रशियाचे हल्ले मात्र वाढतच चालले आहेत.

रशियन माध्यमसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये झेलेन्स्की यांनी युक्रेनचे प्राधान्य हे देशाच्या सार्वभौमत्वाला असून रशियन आक्रमणाला रोखण्यावर आमचा भर असल्याचे नमूद केले. सुरक्षेची हमी, तटस्थ भूमिका आणि अण्वस्त्र नसलेल्या देशाचा दर्जा यामुद्यावरून आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आम्ही याआधीच हे प्रस्ताव ठेवले असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा दबाव आम्हाला मान्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. रशियाने याआधीही युक्रेनने ‘नाटो’मध्ये सहभागी होण्याचा अट्टहास सोडून द्यावा असे स्पष्ट मत मांडले होते. युक्रेन ‘नाटो’मध्ये गेला तर त्याचा आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती रशियाला सतावते आहे. झेलेन्स्की यांनी यावर ‘नाटो’मध्ये सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय हा सर्वस्वी युक्रेनी नागरिकांवर सोपवायला हवा. रशियाने सैन्य माघारी घेतल्यानंतर याबाबत सार्वमत घेता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

थेट करार हवा

आम्हाला रशियाच्या अध्यक्षांसोबत थेट करार हवा आहे. यासाठी पुतीन यांनी स्वतःच्या पावलांनी चालत येत मला भेटून चर्चा करायला हवी असे झेलेन्स्की यांनी नमूद केले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसीप तेय्यीप एर्दोगान यांनी रविवारी आपण ब्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केल्याचे जाहीर केले.

आधी अटींवर चर्चा रशिया

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी उभय देशांमध्ये होणाऱ्या करारांमधील अटींवर चर्चा झाल्यानंतरच दोन्ही देशांचे अध्यक्ष परस्परांना भेटतील असे नमूद केले. काही गोष्टींबाबत स्पष्टता येण्यासाठी दोन्ही देशांमध्ये बैठक होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा पार पडल्यानंतर उद्या (ता.२९) रोजी कराराचा मसुदा देखील निश्चित होईल.

युद्धाच्या आघाडीवर

  • युक्रेनमधील नागरिकांचे रशियाच्या दिशेने पलायन सुरूच

  • स्थानिक चालकांनी त्यांची वाहने युक्रेनी लष्करास दिली

  • युद्धामुळे अरब देशांना होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यास धोका

  • अमेरिकेच्या रशियावरील निर्बंधांमुळे चीन सरकार चिंतित

  • युरोपीयन महासंघ युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांची चौकशी करणार

  • नेदरलॅंडची मद्यउत्पादक कंपनी ‘हेंकेन’ची रशियातून माघार

  • रशियाच्या हल्ल्यात एक हजारांवर लोक ठार झाल्याचा यूएनचा दावा

  • युक्रेनच्या लष्कराकडून कडवट विरोध होत असल्याने रशियाची कोंडी

  • अमेरिका अथवा ‘नाटो’ला रशियात सत्तांतर नको ः जर्मन सरकार

कॉरिडॉर सुरू करण्यास नकार

रशियाकडून होणाऱ्या हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन युक्रेनने पुन्हा मानवी मदतीचे कॉरिडॉर खुले करण्यास नकार दिला आहे. रशियाचे लष्कर केव्हाही आमच्यावर हल्ला करू शकते त्यामुळे नागरिकांना या भागातून बाहेर काढणे जोखमीचे असल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पायाभूत सुविधा उद् ध्वस्त झाल्याने ५६४.६ अब्ज डॉलरचा फटका बसला असल्याचा दावा स्थानिक अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. रशियाने युक्रेनच्या मारिऊपोल या शहराभोवतीचा फास आवळला असून किव्हवरील हल्ले देखील तीव्र केले आहेत. युक्रेनच्या राजधानीला अन्य भागांतून होणारी रसद तोडण्याचे रशियाचे प्रयत्न आहेत. अन्य शहरांवरील रशियाचे मिसाईल हल्ले सुरूच असून लुत्स्क, खारकिव्ह, झायतोमयर आणि रिव्हेन या शहरांवरील हल्ल्याची तीव्रता वाढली असल्याचे युक्रेनच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आले.

अमेरिकी नागरिकांना अणुहल्ल्याची भीती

वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षामध्ये अमेरिका उतरल्यास पुतीन आपल्या देशावर अणुहल्ला करतील, अशी भीती सर्वसामान्य अमेरिकी नागरिकांना सतावते आहे. अनेकांनी पुन्हा शीतयुद्ध सदृश्य स्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे. अमेरिकेतील दहा पैकी तीन लोकांना अणु हल्ल्याची भीती वाटू लागली आहे. ‘दि असोसिएटेड प्रेस- एनओआरसी सेंटर फॉर पब्लिक अफेअर्स रिसर्च’ या संस्थांनी या संघर्षाबाबतचा लोकांचा कौल जाणून घेतला होता. यात दहा पैकी नऊ लोकांना पुतीन हे युक्रेनवर अणुहल्ला करू शकतात, असे वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government Formation Update: बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग ; JDU नेते अमित शहांच्या भेटीला दिल्लीत!

Pachod Crime : भरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला पंचवीस लाखाची रोकड घेऊन जातांना चोरट्यांनी लुटले

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

SCROLL FOR NEXT