russia ukraine war sakal
ग्लोबल

Russia Ukraine: युद्धग्रस्त सुमीमधून ‘ग्रीन कॉरिडॉर’

बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध झाल्याने आज मोठ्या संख्येने नागरिकांनी शेजारील देशांकडे धाव घेतली.

सकाळ वृत्तसेवा

लव्हिव : युद्धग्रस्त युक्रेनमधून नागरिकांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध झाल्याने आज मोठ्या संख्येने नागरिकांनी शेजारील देशांकडे धाव घेतली. मोठ्या संख्येने भारतीय असलेल्या सुमी शहरातून नागरिकांसाठी बस तैनात करण्यात आल्या होत्या. या बस निर्धोकपणे दक्षिणेकडील मॉरिपोल शहराच्या दिशेने गेल्या.

रशियन सैनिकांच्या बाँबवर्षावामुळे नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याचे दोन प्रयत्न फसले होते. हल्ला न करण्याचे आश्‍वासन देऊनही रशियाने गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केल्याने नागरिकांना शहराबाहेर पडता आले नव्हते. शांतता चर्चेच्या तिसऱ्या फेरीनंतर मात्र रशियाने सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. सुरुवात म्हणून आज सुमी शहरातून अनेक बसमधून नागरिक दक्षिण किनाऱ्यावरील मॉरीपोल या शहराकडे रवाना झाल्या. या बसवर रेडक्रॉस संघटनचे चिन्ह लावण्यात आले होते. सुमी शहरात सातशे भारतीय अडकून पडले आहेत. याच शहरातून बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध झाल्याने भारतीयांना दिलासा मिळाला आहे.

रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वीस लाखांवर गेली असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी सांगितले. सुरक्षित मार्ग उपलब्ध झाल्याने त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सुमी शहराला ‘ग्रीन कॉरिडॉर’ उपलब्ध करून दिल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनीही जाहीर केले आहे.

आणखी मार्ग हवेत : झेलेन्स्की

किव्ह : नागरिकांना बाहेर पडण्यासाठी आणखी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी केली आहे. झेलेन्स्की यांनी व्हिडिओ संदेश जारी करत पाश्‍चिमात्य देशांनाही हवाई मदत करण्याचे आवाहन केले.

संयुक्त राष्ट्रांत आरोप-प्रत्यारोप

न्यूयॉर्क : सुरक्षित मार्गांवरही झालेल्या हल्ल्यांवरून संयुक्त राष्ट्रांमध्ये युक्रेन आणि रशियाच्या प्रतिनिधींनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. विदेशी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकार संबंधित देशांच्या दूतावासांशी चोवीस तास संपर्कात आहे. सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिल्यावरही त्यावर रशियाने हल्ले केले, असे युक्रेनच्या प्रतिनिधीने सांगितले. रशियाने मात्र, युक्रेननेच संघर्ष सुरु ठेवल्याने नागरिकांना अडचणी आल्या असा आरोप केला.

सुमी शहरातून सर्व भारतीय बाहेर

नवी दिल्ली : युक्रेनमधील युद्धग्रस्त सुमी शहरात अडकून पडलेले सर्व भारतीय विद्यार्थी या शहराबाहेर पडले असून ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत त्यांना मायदेशी आणण्याची तयारी सुरु असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आज जाहीर केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. ‘सुमी शहरातून सर्व भारतीयांना बाहेर काढण्यात यश आले असून ते सर्वजण पोल्तावा शहराकडे जात आहेत. तेथून ते रेल्वेने पश्‍चिम युक्रेनमध्ये जातील. त्यांना आणण्यसाठी विमाने सज्ज केली जात आहेत,’ असे बागची यांनी आज संध्याकाळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (ता. ७) रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या प्रमुखांशी संवाद साधत भारतीयांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT