ग्लोबल

Video: श्वानाचीही सुटका करा, तरच मी येईन; भारतीय विद्यार्थ्याचा हट्ट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका भारतीय (India) विद्यार्थ्याने आपल्यासह श्वानाचीही सुटका करण्याचा हट्ट धरला आहे. त्याशिवाय युक्रेन सोडण्यास त्याने नकार दर्शविला आहे. रिषभ कौशिक (Rishabh Kaushik) असे विद्यार्थ्याचे, तर मालिबू (Maliboo) असे त्याच्या पेटचे नाव आहे. भारतीय वकिलातीकडूनही काहीही मदत मिळत नाही. कुणीच अद्ययावत स्थितीची माहिती देत नाही, असा आरोप त्याने केला. (Russia-Ukraine War)

तो पुढे म्हणाला की, माझ्याकडे विमान तिकिटाची मागणी केली जात आहे, पण युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद असताना मी तिकीट कुठून आणू... श्वानाला बरोबर नेता यावे म्हणून कागदपत्रांची पुर्तता करीत आहे, मात्र अधिकारी दर वेळी इतरही अनेक कागदपत्रे मागत असल्याचेही त्याने नमूद केले.

अधिकाऱ्याकडून शिवीगाळ

भारत सरकारच्या दिल्लीतील अॅनीमल क्वारंटाइन अँड सर्टिफिकेशन सर्व्हिस तसेच भारतीय वकिलातीशी संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे कौशिकचे म्हणणे आहे. त्याने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला, मात्र संबंधित व्यक्तीने शिवीगाळ केल्याचा आरोप त्याने केला.

खंदकात आसरा

कौशिक सध्या एका खंदकात लपला आहे. श्वानही त्याच्याबरोबर आहे. धोक्याचा इशारा देणारा भोंगा वाजायचा थांबला की तो बाहेर येतो. खंदकात थंडगार हवामान असल्यामुळे श्वानाला ऊब मिळावी हा त्याचा उद्देश असतो. भोंगे तसेच स्फोटांच्या आवाजामुळे श्वान सतत रडत असल्याचे त्याने हताशपणे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT