russia ukraine war one child refugee every 60 seconds says united nations on war  टिम ई सकाळ
ग्लोबल

भीषण! रशिया-युक्रेन युध्दात दर 60 सेकंदाला एक मूल होतंय निर्वासित

सकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सुरु आहे. या युध्दादरम्यान दोन्ही देशांना मोठे नुकसान सहन करावे लागते आहे. या युध्दाची भीषनता सगळ्यांसमोर येत आहे, यातच संयुक्त राष्ट्रांनी मंगळवारी माहिती दिली की, या संघर्षामुळे जवळपास दर मिनिटाला एक मूल निर्वासित होत आहे. युनायटेड नेशन्सची चिल्ड्रन्स एजन्सी, युनिसेफच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या 20 दिवसांमध्ये दररोज 70,000 हून अधिक मुले निर्वासित झाली आहेत.

या युध्दाचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे, हजारो युक्रेनियन नागरिक त्यांची घरे सोडून पळ काढत आहेत. या दरम्यान हिंदुस्थान टाईन्सने दिलेल्या वृत्तानुसार, "युक्रेनमध्ये गेल्या 20 दिवसांत सरासरी दररोज, 70,000 हून अधिक मुले निर्वासित झाली आहेत... मूळात युध्द सुरू झाल्यापासून दर मिनिटाला एक मूल निर्वासित होत आहे," युनाटेड नेशन्सच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने एएफपीने वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.

दरम्यान 24 फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून तीस लाखांहून अधिक लोक निर्वासित झाले आहेत आणि त्यापैकी सुमारे 1.4 मिलियन मुले आहेत असा संयुक्त राष्ट्रांचा अंदाज आहे. गेल्या आठवड्यात युक्रेनच्या मुख्य अभियोक्ता कार्यालयाने सांगितले की, रशियाचे 'स्पेशल मिलिटरी ऑपरेशन' सुरू झाल्यापासून 79 मुले मारली गेली आणि 100 हून अधिक जखमी झाले आहेत. बहुतेक मुले किव्ह, खारकीव्ह, डोनेस्तक, सुमी, खेरसन आणि झायटोमिर प्रदेशातील होती. या प्रदेशांना रशियाच्या हल्ल्यांचा जास्त फटका सहन केला आहे.

मारियुपोलमधील मुलांच्या रुग्णालयावर गेल्या आठवड्यात झालेल्या रशियन हवाई हल्ल्यात एका मुलासह तीन लोक ठार झाले आणि 17 इतर जखमी झाले, ज्यामुळे युद्धग्रस्त देशातील मुलांच्या मृत्यूबद्दल चिंता वाढत आहे.

दरम्यान, उत्तर युक्रेनच्या चेर्निहाइव्ह प्रदेशाकडून मंगळवारी देशव्यापी हवाई हल्ले होण्याचा इशारा दिला आहे. ऑनलाइन पोस्टमध्ये, त्यांनी आपल्या नागरिकांना आश्रयस्थानांकडे जाण्याचे आवाहन केले. दरम्यान मंगळवारी, रशियन सैन्याने रिव्हनेच्या बाहेर एका टेलिव्हिजन टॉवरला लक्ष्य केल्याने नऊ लोक ठार झाले आणि इतर नऊ जण जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT