Ukraine Russia War  Google
ग्लोबल

Russia-Ukraine : युद्धामुळे सर्वसामान्य रशियन जनता बेहाल

बॅंकिंग व्यवस्था ठप्प, एटीएममध्ये ठणठणाट, गुंतवणूकदारांनीही पाठ फिरवली

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को: रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्यानंतर तेथील जनतेचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. अमेरिकेसह युरोपीय देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले असून यामुळे सामान्य जनता होरपळू लागली आहे. संपूर्ण रशियातील बॅंकींग व्यवस्था ठप्प झाली असून डॉलरच्या तुलनेत रशियन रूबलचे अवमूल्यन होताना दिसत आहे. देशातील एटीएम रिकामे झाले असून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनीही रशियाकडे पाठ फिरवली आहे.

आर्थिक संकट

रशियामध्ये देशांतर्गत बेरोजगारी वाढण्याची भीती

अनेक बॅंका, वित्तीय संस्था दिवाळखोरीच्या वाटेवर

मॉस्कोच्या रोखे बाजारावर अस्थिरतेची छाया

निर्बंधामुळे आयात- निर्यात व्यापारासही फटका

कमकुवत घटक कर्जबाजारी होण्याची भीती

रशियावर मंदीची छाया

रशियामध्ये सध्या अराजकसदृश्य स्थिती निर्माण झाली असून हा देश लवकरच महामंदीच्या तडाख्यात सापडू शकतो अशी भीती आर्थिकक्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. लोकांची बॅंकांमधील जमापुंजी संकटात सापडली असून प्रत्येकजण चलन मिळविण्यासाठी रस्त्यांवर धावताना दिसतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT