Russia Ukraine war  eSakal
ग्लोबल

NATO विरुद्ध लढण्यासाठी आमची योजना तयार; रशियाचा आक्रमक पवित्रा

रशियानं थेट नाटोविरुद्धच आक्रमक पवित्रा घेतल्याने संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.

सुधीर काकडे

Russia UKraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेला संघर्ष दिवसेंदिवस आणखी तीव्र होत जाताना दिसतंय. रशियानं (Russia) युक्रेनवर सुरु असलेले हल्ले थांबवले नसल्याने युक्रेनियन लोकांवरील संकट आणखी टळलेलं नाही. तसंच आंतरराष्ट्रीय राजकारण देखील यामुळे ढवळून निघालं आहे. त्यातच आता रशियाने थेट नाटोविरुद्ध (NATO) आक्रमक भूमिका घेतल्याने वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रशियाकडून केले जाणारे हल्ले थांबवण्याचं आवाहन वारंवार नाटोकडून केलं जातंय. त्यानंतर आता रशियाने थेट नाटोविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमच्याकडे नाटोच्या विरोधात योजना आहेत, असं रशियन मुत्सद्दींनी म्हटलं आहे. बोस्निया आणि हर्जेगोव्हिनामधील रशियन राजदूत इगोर कालाबुखोव्ह यांनी बोस्नियाच्या फेस टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "आमच्याकडे नाटोविरूद्ध लढण्यासाठी योजना आहेत. मॉस्को आता फक्त भौगोलिक आणि सामरिक परिस्थितीचा अभ्यास करत आहे. नाटोकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांनाही उत्तर दिलं जाईल" असं रशियन मुत्सद्दींनी म्हटल्याचं वृत्त, कीव इंडिपेंडंटने दिलं आहे.

दरम्यान, रशियाने युक्रेनविरुद्धचा आपला लढा आणखी तीव्र केला आहे. यापूर्वी कधीही युद्धात वापरली नव्हती, ती शस्त्रं वापरण्यास सुरुवाक केली आहे. वृत्तसंस्था RIA नोवोस्तीने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम युक्रेनमध्ये सुरु असलेल्या संघर्षादरम्यान किंझल हायपरसोनिक शस्त्रांचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे. "किंझल या हायपरसॉनिक एरोबॅलिस्टिक क्षेपणास्त्रांने दारूगोळा असलेला एक मोठा भूमिगत गोदाम नष्ट केला" असं रशियन संरक्षण मंत्रालयाकडून देखील सांगण्यात आलं आहे. किंझल हे एक अद्ययावत क्षेपणास्त्र असून, त्याचा वेग हा आवाजाच्या वेगापेक्षा १० पटीने जास्त आहे, तसंच ते एअर डिफेन्स सिस्टीमला सुद्धा भेदू शकतं अशी माहिती स्वत: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT