russia ukraine war pm modi talk  with volodymyr zelenskyy on phone
russia ukraine war pm modi talk with volodymyr zelenskyy on phone  e sakal
ग्लोबल

Modi-Zelenskyy: PM मोदींनी दिला युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना धीर; म्हणाले, सैन्य...

सकाळ डिजिटल टीम

PM Modi-Volodymyr Zelenskyy: PM मोदींनी मंगळवारी (4 ऑक्टोबर) युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा केली. पीएम मोदींनी हा संघर्ष लवकर संपवून संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. संघर्षावर लष्करी तोडगा असू शकत नाही. तसेच शांततेच्या कोणत्याही प्रयत्नात योगदान देण्यास भारत तयार आहे असेही पीएम मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषणात संयुक्त राष्ट्रांची चार्टर, आंतरराष्ट्रीय कायदा आणि सर्व राज्यांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला, असे पीएमओकडून सांगण्यात आले. युद्ध लवकरात लवकर थांबवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आणि संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले पीएम मोदी?

पीएमओने पुढे सांगितले की, युक्रेनसह अणु संस्थानांच्या सुरक्षेला भारत महत्त्व देतो यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. पंतप्रधान म्हणाले की, अणु संस्था धोक्यात आणल्याने सार्वजनिक आरोग्यावर, पर्यावरणावर दूरगामी आणि विनाशकारी परिणाम होऊ शकतात. विशेष म्हणजे पुतिन यांनी युक्रेनमध्ये अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली होती.

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली

तत्पूर्वी, पीएम मोदींनी गेल्या महिन्यात समरकंद, उझबेकिस्तान येथे झालेल्या SCO शिखर परिषदेदरम्यान रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली होती. पीएम मोदींनी पुतीन यांना सांगितले होते की, आजचे युग युद्धाचे नाही आणि मी याविषयी तुमच्याशी फोनवर बोललो आहे. आपण शांततेच्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. भारत आणि रशिया अनेक दशकांपासून एकमेकांसोबत आहेत.

व्लादिमीर पुतिन काय म्हणाले?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतीय पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या चिंतेची कबुली देत ​​युक्रेन संघर्षाबाबत तुमची भूमिका मला माहीत आहे. मला तुमच्या काळजीबद्दल माहिती आहे. आम्हाला हे शक्य तितक्या लवकर संपवायचे आहे, परंतु दुसरा पक्ष, युक्रेन, वाटाघाटी प्रक्रियेत सहभागी होण्यास नकार देतो. असे म्हटले होते.

फेब्रुवारीपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू

रशिया आणि युक्रेनमध्ये 2014 पासून संघर्ष सुरू आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला. या युद्धाला सात महिन्यांहून अधिक काळ लोटला, पण एकही देश झुकायला तयार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT