ग्लोबल

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये चर्चेसाठी गेलेल्या रशियन उद्योजकावर विषप्रयोग

सकाळ डिजिटल टीम

कीव्ह: युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या साधारण एका महिन्यापासून युद्ध सुरु आहे. अजूनही या दोन्ही देशांमधील वाटाघाटी निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलेल्या नाहीयेत. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या अनेक फैरी घडत असून कालही तुर्कस्तानमधील इस्तंबूलमध्ये चर्चा करण्यात आली आहे. अजूनही युक्रेनमधील अनेक महत्त्वाच्या शहरांवर बॉम्बहल्ले सुरुच आहेत. दुसरीकडे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काही विचित्र घटना घडू लागल्या आहेत. (Russia-Ukriane War)

युरोपमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब चेल्सीचे मालक रोमन अब्रामोविच हे या युद्धासंदर्भातच मार्च महिन्याच्या सुरुवातीला युक्रेनमध्ये चर्चेसाठी गेले होते. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने युक्रेनमध्ये गेलेल्या शिष्टमंडळाचा ते देखील एक भाग होते. मात्र, या दौऱ्यादरम्यान त्यांच्यावर आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही जणांवर विषप्रयोग झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबद्दलचं वृत्त वॉल स्ट्रिट जर्नलनं दिलं आहे.

गेल्या ३ मार्चला रोमन अब्रामोविच यांच्यासह तिघांना बैठकीनंतर विष देण्यात आलं. अब्रामोविच हे रशियन नागरिक असून त्यांच्यासह तिघांमध्ये काही विचित्र लक्षणं दिसून आली आहेत, ज्यामुळे हा विषप्रयोगाचा दावा करण्यात येतो आहे. या सगळ्यांना अंगदुखीचा त्रास जाणवू लागला आहे. त्यांचे डोळे लाल झाले आहेत. त्यांच्या हाताची त्वचा निघून जाऊ लागली आहे. या बैठकीला अब्रामोविच यांच्यासह आणखी एक रशियन उद्योगपती आणि युक्रेनचे खासदार उमेरोव हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांच्या शरीरात काही लक्षणं दिसू लागली. काही रासायनिक हत्यारांच्या माध्यमातून हे विष दिल्यानंतर त्यांना ही लक्षणं जाणवू लागली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT