Russia-Ukraine War  Sakal
ग्लोबल

Russia Ukraine War : युक्रेनच्या 1,000 हून अधिक सैनिकांची शरणागती

सकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील युध्दादरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. रशियाने बुधवारी सांगितले की, जवळपास 1,000 हून अधिक युक्रेनियन सैनिकांनी मारियोपोल या शहरामध्ये आत्मसमर्पण केले आहे. एका निवेदनात, रशियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी सांगितले की युक्रेनियन 36 व्या मरीन ब्रिगेडच्या 1,026 सैन्याने युक्रेनियन शहरातील एका मेटल प्लांटमध्ये आत्मसमर्पण केले.

कोनाशेन्कोव्ह पुढे म्हणाले की या सैनिकांमध्ये 162 अधिकारी आणि 47 महिला कर्मचारी आहेत आणि एकूण 151 जखमींना वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या रिपोर्टनुसार युक्रेनने कथित सामूहिक आत्मसमर्पणावर अद्याप कुठलेली भाष्य केलेले नाही. दरम्यान मागील दीड महिन्यापासून दोन्ही देशांमध्ये युध्द सुरु आहे. या युध्दात रशियाने युक्रेनवर हल्ले केले आहेत. युक्रेनमधील अनेक शहरे बेचिराख झाले आहेत तर हजारो लोकांनी देश सोडून पळ काढला आहे.

रशियन न्यूज एजन्सी (TASS) च्या मते, क्रिमियाचे प्रमुख सर्गेई अक्स्योनोव्ह यांनी युक्रेनियन सैनिकांना मारियुपोल सैन्याच्या उदाहरणाचे अनुसरण करत आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये, त्यांनी सांगितले की युक्रेनियन अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाखाली किव्ह राजवटीच्या कृतींमुळे हे पूर्णपणे स्पष्ट होते की ते डॉनबासच्या रहिवाशांना माणूस मानत नाही. "खरंतर, (किव्ह येथील राजकारणी) ना युक्रेनची, ना युक्रेनियन लोकांची पर्वा करत आहेत कारण तो एक परदेशी देश आहे आणि त्यांच्यासाठी परके लोक आहेत," असे क्रिमियाचे प्रमुख पुढे म्हणाले.

दरम्यान, आदल्या दिवशी बाल्टिक राष्ट्र एस्टोनियाच्या संसदेला संबोधित करताना, झेलेन्स्कीने दावा केला की रशिया युक्रेनमध्ये फॉस्फरस बॉम्ब वापरत आहे आणि रशिया नागरिकांविरुद्ध दहशतीची रणनीती अवलंबत असल्याचा आरोप केला. त्यांनी पुढे सांगितले की युक्रेनियन लोकांना जबरदस्तीने निर्वासित करणे थांबवण्यासाठी रशियावर दबाव आणण्यासाठी उपाय शोधणे आवश्यक होते आणि यासोबतच त्यांनी रशियावर अधिक निर्बंध लादण्याच्या आवाहनाचा देखील पुनरुच्चार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Puran Kumar: देश हादरला! IPS ऑफिसरने डोक्यात गोळी झाडून संपवलं आयुष्य, सुसाइड नोटमधून धक्कादायक खुलासा; IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसोबत दौऱ्यावर..

Kolhapur Zilla Parishad : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे गणित बदलणार, सर्वोच्च न्यायालयाने चक्राकार पद्धतीसाठीची याचिका फेटाळली

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळावर दाखल

Shiv Sena Party Symbol Hearing : निवडणुका तोंडावर आणि पुन्हा मिळाली पुढची तारीख, शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीवेळी नेमकं काय घडलं ?

3 Ingredient Kaju Katli for Diwali: यंदाची दिवाळी साजरी करा हेल्दी पद्धतीने; घरीच बनवा फक्त ३ पदार्थांपासून काजू कतली

SCROLL FOR NEXT