russia ukraine war update European countries should completely stop importing oil from russia Ursula von sakal
ग्लोबल

रशियाचे तेल बंद करा-उर्सुला व्हॉन

युरोपीय आयोगाचे आवाहन; आणखी निर्बंधांसाठी प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

ब्रुसेल्स : रशियाच्या अर्थव्यवस्थेला लक्ष्य करण्यासाठी त्यांच्याकडून युरोपीय देशांनी तेल आयात पूर्णपणे बंद करावी, असे आवाहन युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन देर लेयेन यांनी युरोपीय समुदायातील २७ देशांना केले आहे. रशियावर निर्बंधांचा सहावा टप्पाही लागू करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. रशियाकडून युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर तेलनिर्यात होते. यातून रशियाला फायदा होतो. युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला. त्यामुळे रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी त्यांच्याकडून तेल खरेदी बंद करावी, असे आवाहन उर्सुला यांनी केले. रशियावर निर्बंधांचा सहावा टप्पा लागू करताना त्या देशातील आणखी तीन मोठ्या बँकांना ‘स्विफ्ट’ या बॅकिंग व्यवहार यंत्रणेतून वगळण्याचा प्रस्तावही त्यांनी युरोपसमोर ठेवला आहे.

पोपास्ना शहरावर तीव्र हल्ले

युक्रेनच्या पूर्व भागातील दोनेत्स्क आणि लुहान्स्क या प्रदेशांवर रशियाने आजही बाँबवर्षाव केला. येथील पापस्ना शहर दुर्गम भागात असल्याने येथलि नागरिकांसाठी बचत मोहिम राबविणे सोपे नाही, असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या युद्धात इतर देशांनी हस्तक्षेप करण्यास रशियाचा विरोध असून ‘नाटो’च्या मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांना लक्ष्य करणार असल्याचे रशियाचे संरक्षण मंत्री सर्गे लाव्हरोव्ह यांनी आज स्पष्ट केले. या गाड्यांमधून युक्रेनला शस्त्रपुरवठा होतो, असा रशियाचा दावा आहे. रशियाने आज काळ्या समुद्रातील पाणबुडीतूनही युक्रेनवर हल्ले केले.

रस्ते अपघातात २६ मृत्युमुखी

युक्रेनमध्ये आज बस आणि इंधन घेऊन जाणाऱ्या ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला. ही बस पोलंडच्या दिशेने जात होती. या बसमध्ये स्थलांतर करणारे नागरिक होते का, याबाबत निश्‍चित माहिती मिळालेली नाही.

युद्धाच्या आघाडीवर

  • बेलारुसच्या सैन्याचाही सामना करण्यास सज्ज : युक्रेन

  • क्रामातोर्स्क आणि सेवेरोदोनेत्स्क ही शहरे ताब्यात घेण्यासाठी रशियाचे प्रयत्न

  • दोन्बासमधील उत्तर भागावर रशियाचे पूर्ण वर्चस्व

  • मारिऊपोलमधून बचाव मोहिम सुरुच, अनेकांना सुरक्षित बाहेर काढले

  • पुतीन यांना भेटण्याची पोप यांची इच्छा

  • मेक्सिकोमध्ये हजारो स्थलांतरीत

मेक्सिकोसिटी : अमेरिकेत स्थलांतर करण्यासाठी युक्रेनचे शेकडो स्थलांतरीत लोक मेक्सिको सिटीमध्ये दाखल झाले आहे. या सर्वांना अमेरिकेकडून अद्याप प्रवेशाची परवानगी मिळालेली नाही. या शहरातील एका मैदानावर युक्रेनहून येणाऱ्या स्थलांतरीतांसाठी छावणी उभारण्यात आली आहे. दररोज सुमारे पन्नास ते शंभर युक्रेनी नागरिक युरोपमधून विमानाद्वारे मेक्सिकोत येत आहेत. दहा हजार युक्रेनी नागरिकांना आश्रय देण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT