putin
putin  Sakal
ग्लोबल

'युक्रेनने लढाई थांबवली की चर्चा करु'; रशियाच्या उलट्या बोंबा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: रशियानं युक्रेनवर (Ukraine) क्षेपणास्त्र हल्ले चढवल्यानंतर प्रत्यक्ष युद्धाला गुरुवारी सुरुवात झाली. या युद्धामागे रशिया (Russia) आणि अमेरिका (America) यांच्यातील शीतयुद्ध असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे हे युद्ध थांबवावं, अशी मागणी अनेक देशांनी केली आहे. अनेकांनी रशियावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध घालणार असल्याचं जाहीर केलंय. युक्रेनचे भारतातील राजदूत असलेले डॉ. इगोर पोलिखा (Dr Igor Polikha) यांनीही याबाबत भारताकडे मध्यस्थीची विनंती काल केली होती. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काल उशीरा रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना फोन लावला होता. यानंतर आता रशियाचे परराष्ट्र मंत्री यांनी केलेलं विधान चर्चेत आहे. त्यांनी म्हटलंय की, युक्रेनने लढाई थांबवावी.

वास्तविकत: सैन्य कारवाईची सुरुवात रशियाने केलेली आहे. मात्र, रशियाचे परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय की, युक्रेनने लढाई थांबवली की आम्ही चर्चा करु. याबाबतचं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. युक्रेनच्या सैन्याने लढाई थांबवली की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी सांगितलंय.

पुतिन यांना काय म्हणाले PM मोदी?

काल गुरुवारी रात्री पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना फोन लावला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधानांना युक्रेनच्या अलीकडील घडामोडींची माहिती दिली. रशिया आणि नाटो यांच्यातील मतभेद प्रामाणिक संवादानेच सोडवले जाऊ शकतात, असा विश्वास पंतप्रधानांनी पुन्हा एकदा व्यक्त केला. पुढे पंतप्रधान मोदींनी हिंसाचार त्वरित थांबवण्याचं आवाहनही केलं आहे. तसेच राजनयिक वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गावर परत येण्यासाठी सर्व बाजूंनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना युक्रेनमधील भारतीय नागरिकांच्या, विशेषत: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत भारताची असलेली चिंता व्यक्त केली. तसेच सांगितलं की या भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर काढणे आणि भारतात परत आणणे याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो, असंही म्हटलंय. पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन यां दोघांनीही या फोन कॉलमध्ये मान्य केलंय की, त्यांचे अधिकारी दोन देशांमधील मुत्सद्दी हितसंबंधांच्या मुद्द्यांवर नियमित संपर्क ठेवतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT