Zelensky Sakal
ग्लोबल

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष Zelensky राजधानी सोडून पळाले?

सकाळ डिजिटल टीम

रशियन लष्कराने केलेल्या आक्रमणासमोर झुकणार नाही, अशी भूमिका युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी घेतलीये. शरण या म्हणणाऱ्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सैन्यासमोर अखेरच्या श्वासापर्यंत लढेन, अशा शब्दांत त्यांनी जशास तसे उत्तर देण्यास सज्ज आहोत, असा पवित्रा घेतलाय. पण आता त्यांनी राजधानीतून पळ काढल्याचे वृत्त समोर येत आहे. वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी राजधानी किव सोडल्याचा दावा रशियन प्रसारमाध्यमांकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात युक्रेनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

शुक्रवारी युक्रेनची राजधानी किववर रशियाने हल्ला केल्यामुळे अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना किवसोडण्याचा सल्ला दिला होता. यासाठी अमेरिकेने मदत देण्याचे आश्वासन दिले होते. पण झेलेन्सी यांनी अमेरिकेची ही ऑफर धुडकावून लढण्याची तयारी दर्शवली होती.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी राजधानी किव सोडून पळ काढला आहे, असा दावा रशियन प्रसारमाध्यमांनी केलाय. याआधी राष्ट्राध्यक्षांनी खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. युक्रेनच लष्कर अखेरच्या श्वासापर्यंत जनतेसाठी लढेल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळेच रशियातील प्रसारमाध्यमांनी केलेला दावा आता चर्चेत आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

Pune Flood Alert: पुण्यात धोक्याची घंटा! एकतानगरमध्ये ४० कुटुंबांतील १०० नागरिक स्थलांतरित; मुठा नदीतील पातळीत वाढ झाल्याने पाणी घुसले

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

Latest Marathi News Live Update : नागपूर - रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाट जड वाहतुकीसाठी बंद

SCROLL FOR NEXT