Russia Ukraine Sakal
ग्लोबल

Russia Ukraine: सुरक्षेची हमी द्या, तडजोड करतो; युक्रेनचे आवाहन

शस्त्रसंधी केल्यास ‘नाटो’ सदस्यत्वाची मागणी सोडण्याची तयारी

सकाळ वृत्तसेवा

किव्ह : युक्रेनमधील संघर्ष थांबविण्यासाठी रशियाबरोबर तडजोड करण्यास तयार असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी आज जाहीर केले. तातडीने शस्त्रसंधी, रशियातून सैन्य माघारी आणि युक्रेनच्या सुरक्षेची हमी या बदल्यात युक्रेन नाटोचे सदस्यत्व न घेण्याचे आम्ही मान्य करू, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

युक्रेन युद्धात रशियाची आगेकूच थांबली असली तरी त्यांच्या अविरत बाँबवर्षावामुळे युक्रेनमधील अनेक शहरे उद्‌ध्वस्त झाली असून शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाश्‍चिमात्यांकडून मदत साहित्य मिळत असले तरी युक्रेनला हव्या असलेल्या प्रमाणात शस्त्रांचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे युक्रेन सरकार हैराण झाले आहे. या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी एका मुलाखतीमध्ये तडजोडीस तयार असल्याचे सांगितले.

‘ही तडजोड सर्वांसाठीच फायद्याची आहे. ‘नाटो’च्या संदर्भात युक्रेनचे काय करायचे, असा प्रश्‍न पाश्‍चिमात्यांना पडला आहे; आम्हाला सुरक्षेची हमी हवी आहे; रशियाला नाटोचा विस्तार नको आहे. त्यामुळे, युक्रेनमधून सैन्य माघारी घेऊन रशियाने आम्हाला सुरक्षेची हमी दिल्यास आम्ही ‘नाटो’च्या सदस्यत्वाचा आग्रह सोडून देऊ,’ असे झेलेन्स्की यांनी मुलाखतीदरम्यान जाहीर केले. रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्याशी थेट चर्चा करण्याच्या आवाहनाचाही झेलेन्स्की यांनी पुनरुच्चार केला. पुतीन यांच्याबरोबर चर्चा केल्याशिवाय रशियाला युद्ध थांबवायचे आहे की नाही, हे समजणारच नाही, असे झेलेन्स्की म्हणाले.

रशियन सैन्याला हुसकावून लावले

किव्ह, ता. २२ (पीटीआय) : राजधानी किव्हभोवतीचा वेढा रशियाने आवळला असला तरी युक्रेनच्या सैनिकांकडूनही जोरदार प्रतिकार होत आहे. या सैनिकांनी आज रशियन सैनिकांच्या ताब्यात गेलेल्या एका उपनगरावर पुन्हा आपले नियंत्रण मिळवले. मारिउपोल शहरात मात्र रशियाने आजही जोरदार बाँबफेक करत नागरिकांना जेरीस आणले. इतर शहरांमधील त्यांची आगेकूच अद्याप ठप्प आहे.

युक्रेन-रशिया युद्धाचा आज २७ वा दिवस होता. आक्रमण केल्यानंतर काही दिवसांतच राजधानी किव्हभोवती वेढा घातलेल्या रशियन सैनिकांना हे शहर अद्याप ताब्यात घेता आलेले नाही. विमानातून हल्ले, क्षेपणास्त्रांचा आणि रणगाड्यांतून तोफगोळ्यांचा अविरत मारा करूनही हे शहर त्यांच्या हाती लागलेले नाही. आज युक्रेनी सैनिकांनी माकारिव्ह या किव्हचे उपनगर असलेल्या गावातून रशियन सैनिकांना हुसकावून लावत त्यावर पुन्हा नियंत्रण मिळवले. यावेळी दोन्ही फौजांमध्ये मोठा संघर्ष झाला. हे गाव ताब्यात आल्याने किव्हमध्ये येणाऱ्या महामार्गावरही युक्रेनी सैनिकांचे नियंत्रण प्रस्थापित झाले असून रशियाच्या रणगाड्यांना या मार्गाने किव्हमध्ये येताना तीव्र प्रतिकाराला सामोरे जावे लागणार आहे. जमिनीवरील आगेकूच ठप्प झाली असल्याने रशियाने हवाई हल्ल्यांवर अधिक भर दिला आहे.

आंदोलकांचे कौतुक

खेरसन शहरात रशियन सैनिकांसमोर आंदोलन करणाऱ्या नागरिकांचे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी कौतुक केले. या युद्धाने सामान्य नागरिकांनाही शूरवीर बनविले आहे आणि शत्रूला हा विरोध अनाकलनीय आहे, असे झेलेन्स्की म्हणाले.

या तडजोडींना युक्रेन तयार

  • नाटोचे सदस्यत्वाची मागणी सोडून देणार

  • रशियाच्या ताब्यातील क्रिमियाच्या दर्जाबाबत तडजोड करणार

  • युक्रेनच्या पूर्व भागात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या दोन्बास भागाच्या दर्जाबाबतही चर्चा करणार

स्थलांतरितांची संख्या ३५ लाखांवर

जीनिव्हा : युक्रेनमधून स्थलांतर करणाऱ्यांची संख्या ३५ लाखांवर गेली असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर विभागाने सांगितले. दुसऱ्या महायुद्धानंतरचे युरोपमधील हे सर्वांत मोठे स्थलांतर आहे. एकूण स्थलांतरीतांपैकी सर्वाधिक २१ लाख जण पोलंडला गेले आहेत. रूमानियामध्ये पाच लाख ४० हजार, तर मोल्दोवामध्ये तीन लाख ६७ हजार युक्रेनींनी आश्रय घेतला. युक्रेन-रशिया युद्धामुळे चाळीस लाख लोक स्थलांतरीत होतील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तविला होता. स्थलांतराशिवाय, युक्रेनमध्येचा ६५ लाख नागरिक विस्थापित झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT