journalist
journalist 
ग्लोबल

पुतीन विरोधी पत्रकाराची पेटवून घेत आत्महत्या; फेसबुकवर केली 'सुसाइड पोस्ट

सकाळन्यूजनेटवर्क

मॉस्को- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा विरोध वाढताना दिसत आहे. रशियातील न्यूज एडिटर इरीना स्लावीना यांनी मंत्रालयाच्या ऑफीससमोरच स्वत:ला आग लावून घेतली आणि यात त्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी इरीना यांनी फेसबुक पोस्ट लिहिली होती. माझ्या मृत्यूसाठी रशियन सरकारला जबाबदार धरा, असं त्या पोस्टमध्ये म्हणाल्या होत्या. 

लोकशाही समर्थक ग्रुप 'open russia'शी संबंधीत काही सामानासंबंधी इरीना यांच्या फ्लॅटची झडती घेण्यात आली होती. इरीना यांचे कॉम्युटर आणि डेटा जप्त करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

मंत्रालयासमोरच लावली स्वत:ला आग

घटनेचा व्हिडिओ समोर आला असून यात एक व्यक्ती त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण, इरीना या व्यक्तीला धक्का देतात, त्यानंतर त्या स्वत: खाली पडल्या. रशियाच्या इन्वेस्टिगेटिव कमिटीने त्यांचा मृत्यूची पुष्टी केली आहे. मात्र, त्यांनी इरीना यांच्या घराची झडती घेण्यात आली नसल्याचे सांगितले आहे. 

इरीना Koza Press न्यूज वेबसाईटची एडिटर-इन-चीफ होत्या. निझनी नोवगोरोड भागात ज्या सात लोकांच्या घराची झडती घेण्यात आली होती, त्यातील इरीना या एक होत्या. इरीना यांच्या मृत्यूनंतर वेबसाईट बंद करण्यात आली आहे. इरिना यांनी फेसबुक पोस्ट करुन म्हटलं होतं की, 12 लोक जबरदस्तीने माझ्या घरामध्ये शिरले आणि त्यांनी लॅपटॉप, मेमरी कार्ड, मुलीचा लॅपटॉप आणि फोन घेऊन गेले. दुसरीकडे, इन्वेस्टिगेटिव कमिटीचे म्हणणे आहे की, इरीना या संदिग्ध आरोपी नव्हत्या, तर केवळ साक्षीदार होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार Open Russia च्या Free People फोरममध्ये मागील वर्षी एप्रिलमध्ये इरीना यांनी पत्रकार म्हणून सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांना 5 हजार रुबलचा दंड ठोठावण्यात आला होता. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT