modi putin 
ग्लोबल

India-Russia: मोदींनी शब्द टाकला अन् पुतिन यांनी लगेच मान्य केलं! रशियाच्या लष्करात असलेल्या सर्व भारतीयांची सुटका होणार

Russia will discharge all Indians: रशियामध्ये गेलेले भारतीय ज्यांना लष्करामध्ये भरती करून घेण्यात आले होते त्या सर्वांना सोडण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. त्यामुळे हा भारत सरकारसाठी मोठा विजय मानावा लागेल.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया दौऱ्यावर आहेत. मोदी आणि पुतिन यांच्यात भेट झाली आहे. भेटीमध्ये पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याकडे केलेली विनंती मान्य झाली आहे. रशियामध्ये गेलेले भारतीय ज्यांना लष्करामध्ये भरती करून घेण्यात आले होते त्या सर्वांना सोडण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. त्यामुळे हा भारत सरकारसाठी मोठा विजय मानावा लागेल.

रशियामध्ये अनेक भारतीय कामानिमित्त गेले होते. त्यातील अनेकांना बळजबरीने रशियाच्या लष्करामध्ये भरती करण्यात आले होते. शिवाय त्यांना रशिया-युक्रेन युद्धामध्ये युद्धभूमीवर पाठवले जात होते. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी पु्तिन यांच्याकडे शब्द टाकला होता. त्यानंतर पुतिन यांनी रशियाच्या लष्करातील सर्व भारतीयांना सोडण्याचा आणि त्यांना परत मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मोदींच्या रशिया भेटीचे हे मोठे फलित आहे असं म्हणता येईल.

युक्रेन-रशिया युद्धामध्ये भारतीय तरुणांचा बळी जात होता. कामानिमित्त गेलेल्या भारतीय तरुणांना रशियाकडून लष्करात भरती करून घेतले जात होते. याबाबत भारताने रशियाकडे मुद्दा उपस्थित केला होता. भारतातूनही याबाबत सरकारवर दबाव वाढला होता. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी रशियाचे त्यांचे समकक्ष सर्जेव लावरोव यांच्याकडे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अखेर भारताच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या एका निवेदनात म्हणण्यात आलं होतं की, रशियाच्या लष्करात काम करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांचा युद्धादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत सरकारने याबाबत गांभीर्याने विचार सुरू केला होता. भारतीय तरूणांनी दुसऱ्याच्या युद्धात काम करावं किंवा जीव द्यावा हे योग्य नाही. हे कधीही स्वीकारले जाऊ शकत नाही, असं एस जयशंकर म्हणाले होते.

मोठ्या रकमेचे आमिष दाखवून भारतीयांना रशियाच्या लष्करात भरती करण्यात आले होते. पण, त्यानंतर त्यांना सीमेवर पाठवण्यात आले. काही तरूणांनी व्हिडिओच्या माध्यमातून भारत सरकारकडे मदतीची याचना केली होती. माहितीनुसार, आतापर्यंत १० भारतीय मायदेशी परत आले आहे. २० पेक्षा जास्त रशियाच्या लष्करामध्ये भरती झालेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT