Russian astronauts wear dress color of Ukrainian flag New York sakal
ग्लोबल

रशियन अंतराळवीर युक्रेनच्या ध्वजाच्या रंगात

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात दाखल

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : रशियाच्या ‘रोसकॉसमॉस’ या अंतराळ संशोधन संस्थेचे तीन अंतराळवीर आज आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात दाखल झाले. विशेष म्हणजे, या तिघांनीही युक्रेनच्या ध्वजाच्या रंगांशी साधर्म्य असलेला निळा व पिवळा पोशाख परिधान केला होता. गेल्या महिन्यात रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून या अवकाश स्थानकात प्रथमच अंतराळवीरांचे आगमन झाले.

ओलेग आर्टेमयेव, डेनिस मॅटवेयेव आणि सर्गेई कोर्साकोव्ह अशी या अंतराळवीरांची नावे आहेत. कझाकस्तानमधील रशियाने भाडेतत्वावर घेतलेल्या बायकोनूर प्रक्षेपण केंद्रावरून त्यांनी ‘सोयूझ एमएस-२१’ या अंतराळयानातून शुक्रवारी रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी यशस्वीरीत्या उड्डाण केले. त्यानंतर, अवघ्या तीन तासांत ते आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर उतरले. अवकाश स्थानकाच्या परिभ्रमण केंद्रावर यापूर्वीच उपस्थित असलेल्या दोन रशियन, चार अमेरिकी आणि एका जर्मन अंतराळवीरांबरोबर ते सहभागी झाले. यावेळी रशियन अंतराळवीर आर्टेमयेव याने अंतराळयान अवकाशस्थानकाशी जोडतानाचा व्हिडिओ काढला. त्यांनी नेहमीच्या पोशाख बदलून पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान का केला, त्यातून काही संदेश द्यायचा होता का, हे स्पष्ट झाले नाही.

अंतराळ स्थानकात स्थिर झाल्यावर आर्टेमयेवने पृथ्वीवर कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यावेळी, त्याला या पिवळ्या रंगाच्या पोशाखाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी प्रत्येकाने आपल्या पसंतीनुसार पोशाखाचा रंग निवडल्याचे त्याने सांगितले. आम्ही पिवळ्या रंगाचे भरपूर साहित्य जमा केले होते. ते वापरण्याची आम्हाला गरज होती. त्यामुळे, आम्हाला पिवळे कपडे परिधान करावे लागले, असेही त्याने स्पष्ट केले. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून अनेकजण युक्रेनच्या ध्वजाचा वापर करून त्या देशाला सहानुभूती दर्शवीत आहेत.

रशिया अमेरिकेला सहकार्य करेल : नासा

या युद्धामुळे अंतराळ मोहिमांवरही विपरीत परिणाम झाला आहे. अनेक अंतराळ यानांची उड्डाणे रद्द झाली असून करारही संपुष्टात आले आहेत. ‘रोसकॉसमॉस’ चे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांनी रशियाने अमेरिकी कंपन्यांना रॉकेट इंजिनचा पुरवठा थांबवला आहे. त्यामुळे, अमेरिकेला अंतराळात जाण्यासाठी आता झाडूचा वापर करावा लागेल, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. मात्र, यामुळे रशिया अंतराळ स्थानकातील अमेरिकेबरोबरची अनेक वर्षांची शांततामय भागीदारी संपुष्टात आणत आहे, अशी चिंताही अनेकजणांना भेडसावत आहे. मात्र, रोगोझिन अशा प्रकारची वक्तव्ये करत असले तरी अंतिमतः: ते अमेरिकेबरोबर काम करतील, अशा शब्दांत अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी सुनावले. पुढील महिन्यात नासाचे आणखी तीन आणि इटलीचा एक अंतराळवीरही रशियाच्या अवकाश स्थानकात जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT