Harry Potter Castle 
ग्लोबल

Russian Attack Video: रशियाच्या मिसाईल हल्ल्यात 'हॅरी पॉटरचा किल्ला' उद्धवस्त; 5 जणांचा मृत्यू

Harry Potter Castle Destroyed: शिया आणि युक्रेनमधील युद्ध गेल्या जवळपास दीड वर्षांपासून अद्याप सुरु आहे. दोन्ही देशांनी संघर्ष सुरुच ठेवला असून कोणीही माघार घ्यायला तयार नाही.

कार्तिक पुजारी

मॉस्को- रशिया आणि युक्रेनमधील युद्ध गेल्या जवळपास दीड वर्षांपासून अद्याप सुरु आहे. दोन्ही देशांनी संघर्ष सुरुच ठेवला असून कोणीही माघार घ्यायला तयार नाही. रशियाने केलेल्या मिसाईल हल्ल्यामध्ये (Russian Missile Attack) काळ्या समुद्रात असलेल्या युक्रेनच्या ओडेसा शहरातील अनेक मोठ्या इमारतींना लक्ष केलं आहे. या हल्ल्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अनेक जण जखमी झाले असून त्यात लहान मुले आणि गरोदर महिलेचा देखील समावेश आहे. रशियाने हल्ल्या केलेल्या अनेक इमारतींपैकी एक वास्तू 'हॅरी पॉटरचा किल्ला' म्हणून ओळखली जाते. या वास्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. युक्रेनने या हल्ल्याची पुष्टी केली असून रशियाच्या मिसाईल हल्ल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Harry Potter Castle Destroyed)

रशियाच्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झालाय, तर तीसपेक्षा अधिकजणांचा दुखापत झाली आहे. सीएनएनने यासंदर्भातील वृत्त दिलंय. जखमींमध्ये दोन लहान मुले आणि एका गरोदर महिलेचा समावेश आहे. मिसाईल हल्ल्यामध्ये जवळपास २० इमारतींचे नुकसान झाले आहे. यामध्ये 'हॅरी पॉटरचा किल्ला' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका शैक्षणिक संस्थेचा देखील समावेश आहे.

हॅरी पॉटर चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे या वास्तूची रचना असल्याने याला त्याच नावाने ओळखले जाते. व्हिडिओ आणि फोटोमध्ये वास्तूचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. रशियाकडून हल्ल्यासाठी घातक मिसाईला वापर करण्यात आला आहे. यावरुन रशियाचा इरादा काय आहे हे दिसून येत अशी टीका पोलीस अधिकारी अॅड्रीये कोस्टिन म्हणाले आहेत.

दुसरीकडे, युक्रेनने देखील रशियाच्या काही ठिकाणांवर हल्ला केल्याची माहिती आहे. मात्र, रशियने अधिकाऱ्यांनी हल्ला झाला असल्याचं नाकारलं आहे. अधिकाऱ्यांनी म्हटलं की, रशिया कोणत्याही मिसाईल हल्ल्यांना रोखू शकते. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाने एकाप्रकारे जगाला संकटात टाकले आहे. तेलाच्या किंमती वाढण्याचा धोका आहे. शिवाय युद्ध लवकरच थांबले नाही तर नाटो देशांच्या हस्तक्षेपाची देखील शक्यता आहे. अशा स्थितीत युद्धाची व्याप्ती आणखी वाढू शकते. संयुक्त राष्ट्राकडून युद्धविरामासाठी प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा, राष्ट्रपतींकडे सोपवलं राजीनाम्याचं पत्र

१२ चौकार, १३ षटकार! वैभव सूर्यवंशीच्या भीडूचे ३२ चेंडूंत शतक; राजस्थान रॉ़यल्सचा फलंदाज IPL 2027 मध्ये यशस्वी जैस्वालच्या जागी खेळणार?

Chhatrapati Sambhajinagar: १८ दिवसात २० छापे, कोट्यवधींचा माल जप्त; १४ जणांना अटक, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Super El Nino : भयंकर संकट! जगावर घोंघावतोय 'सुपर अल निनो'; नासाच्या उपग्रहाने टिपले धक्कादायक फोटो, 1997 सारखा विनाश होणार?

Shocking News : लग्नाची लगबग, दारात मांडव सजला, पण एक दिवस आधीच वधूसह अख्ख्या कुटुंबाने जीवन संपवलं; धक्कादायक घटनेने सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT