Russia Ukraine War  Russia Ukraine War
ग्लोबल

रशियन सैनिकांचा बंड! ६० पॅराट्रूपर्संचा युध्दास नकार; तुरुंगात डांबले

सकाळ डिजिटल टीम

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनमधील युद्धावरून नव्या संकटाला तोंड देत असल्याचे दिसत आहे. रशियन सैनिक उठाव करीत आहेत. ६० रशियन पॅराट्रूपर्सनी बंड केले आहे. त्यांनी युक्रेनशी युद्ध करण्यास नकार दिला. अहवालानुसार या बंडखोरांना लष्कराने तुरुंगात डांबले आहे. एवढेच नाही तर तुरुंगातही अत्याचार केले जात आहेत.

युक्रेन आणि रशिया (russia) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला आता दोन महिने होतील. इतके दिवस युद्ध होऊनही निकाल लागलेला नाही. मात्र, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. अहवालानुसार, सुमारे ६० रशियन पॅराट्रूपर्सनी बंड केले आणि युक्रेनच्या बाजूने लढण्यास नकार दिला आहे. ‘द मिरर’मधील अहवालात म्हटले आहे की, उत्तर रशियातील पस्कोव्हमधील प्रमुख हवाई दलाच्या मुख्यालयातून आलेल्या पॅराट्रूपर्सना आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल तुरुंगात टाकण्यात आले आहे.

युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी रशियन (russia) सैन्याला बेलारूसमध्ये नेण्यात आले होते. परंतु, त्यांच्या बंडानंतर रशियन सैन्य हतबल झाले. यानंतर त्या सैनिकांना पस्कोव्ह येथील त्यांच्या तळावर परत पाठवण्यात आले. काहींना बडतर्फ करून ‘भ्याड’ असे नाव देण्यात आले, तर काहींना तुरुंगवासासह कोर्ट मार्शलची शिक्षा देण्यात आली आहे. इतकेच नाही तर तुरुंगात टाकून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत.

पस्कोव्हमधील रशियन पॅराट्रूपर्सनी युक्रेनविरुद्ध लढण्यास नकार दिला तेव्हा ते पुतिनपर्यंत पोहोचले. संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी घाईघाईने त्यांचे एक प्रतिनिधी पस्कोव्हला त्यांचे मन वळवण्यासाठी पाठवले. परंतु, त्यांना यश आले नाही. रशियन आउटलेट पस्कोव्हका या गुबर्नियाने आपल्या अहवालात सूत्रांचा हवाला देत सांगितले की, सुमारे ६० सैनिकांनी युक्रेनियन भूभागावर युद्ध करण्यास नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Srikant Shinde: हिंदुत्वाची विश्वासार्हता गमावली: देवदर्शनानंतर श्रीकांत शिंदेंचा राजकीय हल्लाबोल, खासदार ओमराजे निंबाळकरांसह शनिदर्शन

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण इन, कोण आउट? संभाव्य यादी समोर; महाराष्ट्रातूनही 'हे' नाव चर्चेत, धर्मेंद्र प्रधानांचं खातं कुणाला?

Chhatrapati Sambhajinagar: घाटीची वाटचाल कॉर्पोरेटकडे ; १७ वर्षांनंतर ट्रॉमा आयसीयूचा कायापालट; वॉर्ड २९ चे लोकार्पण

Satyajeet Tambe: पेपरफुटीने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेचा बुरखा फाडला: आमदार सत्यजित तांबे; ४ लाख २८ हजारांहून उमेदवारांवर अन्याय

Latest Marathi News Update : खिद्रापूरमध्ये कोपेश्वर मंदिर बंद; अतिक्रमण वादावर ग्रामस्थांचे साखळी उपोषण

SCROLL FOR NEXT