russian-president-praised-pm-narendra- 
ग्लोबल

"मोदींना घाबरवता अन् धमकावले जाऊ शकत नाही..."; पुतिन यांचा AI Video व्हायरल

Sandip Kapde

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींना घाबरवल्या आणि धमकावले जाऊ शकत नाही. तसेच भारतीय जनतेच्या विरोधात कोणतीही कारवाई किंवा निर्णय घेण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असे पुतीन म्हणाले. रशियाच्या पब्लिक ब्रॉडकास्टर आरटीने एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये पुतिन पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.

व्लादिमीर पुतीन म्हणाले, "रशिया आणि भारताचे संबंध सतत सर्व दिशांनी विकसित होत आहेत आणि याची मुख्य हमी पंतप्रधान मोदींचे धोरण आहे. मोदींना भारताची काळजी आहे. भारताचे राष्ट्रहीत, भारताच्या लोकांच्या विरोधात कोणतीही कारवाई किंवा निर्णय घेण्यासाठी मोदींना घाबरवता किंवा धमकावले जाऊ शकत नाही."

"प्रामाणिकपणे सांगायचे तर, भारतीय लोकांच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्याच्या त्यांच्या कठोर भूमिकेमुळे मला कधी कधी आश्चर्य वाटते," असे देखील पुतीन म्हणाले. व्हिडिओसोबत ट्विट पोस्टमध्ये लिहिले आहे की, या व्हिडिओमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा आवाज AI जनरेट आहे.

पुतीन यांनी यापूर्वीही अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांचे कौतुक केले आहे. ऑक्टोबर महिन्यात त्यांनी प्रशंसा केली होती आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली शक्तिशाली देश भारत मजबूत होत असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते, "भारताची लोकसंख्या दीड अब्जाहून अधिक आहे, आर्थिक वाढ सात टक्क्यांहून अधिक आहे... हा एक शक्तिशाली देश आहे. आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली तो मजबूत होत आहे..."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT