Russian President Vladimir Putin has warned that if country intervenes in Ukraine war Attacks intensify sakal
ग्लोबल

हस्तक्षेप केल्यास विद्युतवेगाने प्रत्युत्तर- व्लादीमिर पुतीन

पुतीन यांचा इतर देशांना इशारा; पूर्व युक्रेनमधील हल्ले तीव्र

सकाळ वृत्तसेवा

सेंट पीटर्सबर्ग (रशिया) : युक्रेन युद्धात तिसऱ्या देशाने हस्तक्षेप केल्यास त्यांना विद्युतवेगाने प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी दिला आहे. युक्रेनच्या मदतीसाठी युरोपीय देश हालचाली करत असल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाने हा इशारा दिला आहे. सेंट पीटर्सबर्ग येथे लोकप्रतिनिधींबरोबर संवाद साधताना पुतीन यांनी युरोपीय देशांवर टीका केली. ते म्हणाले,‘‘बाहेरील कोणी देश युक्रेनमध्ये हस्तक्षेप करत असेल आणि रशियाला धोका उत्पन्न करत असेल, तर वीजेच्या वेगाने आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ.

इतरांजवळ नाहीत, अशी अनेक शस्त्रे आमच्याकडे आहेत. आम्ही ती जपून ठेवणार नाहीत, गरज पडल्यास त्याचा वापरही करू.’’ वेळ पडल्यास कशा प्रकारे प्रत्युत्तर द्यायचे, याचेही पूर्ण नियोजन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. युक्रेनला मदत करण्यापासून इतर देशांना रोखण्यासाठी पुतीन यांनी ही धमकी दिली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. युद्धात रशियाचा पराभव करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे अमेरिकेने जाहीर केले असून युरोपमधील इतर देशही युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा करत आहेत. त्यावर रशियाने जोरदार आक्षेप घेतला आहे. दरम्यान, युक्रेनच्या पूर्व भागातील हल्ले रशियाने अधिक तीव्र केले आहेत. दोनेत्स्क आणि लुहान्स्क हे दोन्ही प्रदेश ताब्यात घेण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. लुहान्स्कमध्ये आज दिवसभरात हल्ल्यांमध्ये चार नागरिकांचा मृत्यू झाला. खारकिव्हवरही विमानांतून आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले सुरूच आहेत.

युद्धाच्या आघाडीवर

  • संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष युक्रेनमध्ये दाखल

  • युक्रेनला तोफा, लष्करी वाहने पुरविणार : जर्मनी

  • मारिउपोलच्या पोलाद प्रकल्पावरील हल्ले अधिक तीव्र

  • दोन युद्धनौका बुडूनही रशियाची हल्ल्यांची क्षमता शाबूत : ब्रिटन

रशिया बेजबाबदार : उर्सुला

पॅरिस : पोलंड आणि बल्गेरियाचा नैसर्गिक वायूचा पुरवठा बंद करून रशिया त्यांना ‘ब्लॅकमेल’ करत असल्याची टीका युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन देर लेयेन यांनी केली आहे. तसेच, कराराचे पालन न करता अडचणीत आणणारा रशिया हा बेजबाबदार पुरवठादार असल्याचेही यामुळे सिद्ध झाले आहे, असे उर्सुला म्हणाल्या. रशियाने मात्र, युरोपीय देशांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळेच आम्हाला हे पाऊल उचलावे लागले, असा दावा केला आहे.

सुरक्षा परिषदेची अनौपचारिक बैठक

युक्रेनमध्ये केलेल्या अत्याचारांसाठी रशियाला जबाबदार धरण्याची मागणी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या आज झालेल्या अनौपचारिक बैठकीत झाली. आतापर्यंत विविध देश करत असलेली ही मागणी प्रथमच प्रत्यक्ष कारवाई करणाऱ्या संस्थांनी केली आहे. या बैठकीला आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे मुख्य वकील, संयुक्त राष्ट्रांच्या चौकशी आयोगाचे अध्यक्ष, युक्रेन सरकारचे वकील आणि मानवी हक्कांबाबतचे वकील अमल क्लूनी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT