किव्ह : रशियाच्या युद्धनौकांनी थेट अझोव्हच्या समुद्रातून युक्रेनवर हल्ले करायला सुरूवात केल्यानंतर युक्रेननेही आज त्याला सडेतोड उत्तर दिले. रशियाचे एक लढाऊ जहाज युक्रेनच्या लष्कराने उद्ध्वस्त केले. ते मारिऊपोलपासून ४५ मैल अंतरावर होते अशी माहिती सूत्रांनी दिली. राजधानी किव्हमधूनही रशियन लष्कराला जोरदार प्रतिकार होत असून रशियाने ताब्यात घेतलेला भूप्रदेश परत मिळविण्याच्या हालचाली युक्रेनकडून सुरू झाल्या आहेत. मागील चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन संघर्षामध्ये रशियाचे सात ते पंधरा हजार सैनिक ठार झाले असल्याचा अंदाज ‘नाटो’कडून व्यक्त करण्यात आला आहे.
रशियन आक्रमणाला युक्रेनमधून विरोध होऊ लागला असून या संघर्षाची जबरदस्त किंमत बलाढ्य अशा रशियन लष्कराला देखील मोजावी लागत आहे. तत्पूर्वी दहा वर्षे चाललेल्या अफगाणिस्तान युद्धामध्ये १५ हजार रशियन सैनिकांना प्राण गमवावे लागले होते. आता युक्रेनविरोधातील युद्धामध्ये मृत्युमुखी पडलेल्या रशियन सैनिकांचा आकडा वाढू लागल्याने पुतीन यांची नाचक्की होऊ लागली आहे. मारिऊपोलमधील रशियन हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढली असून अनेक इमारती आणि रस्ते बॉम्ब हल्ल्यांमध्ये बेचिराख झाले आहेत. या शहरामध्ये अद्याप एक लाख लोक अडकून पडल्याची भीती व्यक्त होत आहे.
बत्ती गूल, गॅस संपला
मारिऊपोलमधील बत्ती देखील गूल झाली असून पेयजल आणि नैसर्गिक वायूचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. अनेकजण हे बर्फ वितळवून त्याचे पाण्यामध्ये रुपांतर करत असून त्याचा पिण्यासाठी वापर करू लागले आहेत. दूषित पाणी पिल्यामुळे मुलांना अतिसाराचा त्रास होऊ लागला आहे. मुख्य शहरामध्ये रस्त्यांवर मृतदेह पडले असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी जगभरातील अन्य देशांना मदतीचे आवाहन केले आहे.
सैनिक १५६००
हेलिकॉप्टर १२४
रणगाडे ५१७
लढाऊ विमाने १०१
युद्धनौका ४
ड्रोन ४२
मदत करणारी वाहने १००८
तोफा २६७
मल्टिपल रॉकेट लाँचर ८०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.