Salima Mazari a female district governor Massoud Hossaini
ग्लोबल

अफगाणिस्तानच्या पहिल्या महिला राज्यपाल सलीमा माझारींना तालिबानने बनवलं बंदी

तालिबान विरोधात लढण्यासाठी त्यांनी शस्त्र हाती उचललं होतं.

दीनानाथ परब

काबूल: अफगाणिस्तानच्या (afganistan) पहिल्या महिला राज्यपाल (governer) सलीमा माझारी (Salima Mazari) यांना बंधक बनवण्यात आले आहे. त्यांनी तालिबान (Taliban) विरोधात लढण्यासाठी बंदुक हातात घेतली होती. त्या सध्या कुठे आहेत, त्या बद्दल कुठलीही माहिती नाहीय. तालिबान राज येणार स्पष्ट झाल्यानंतर अनेक अफगाणि नेते देशसोडून पळाले. पण सलीमा माझारी अफगाणिस्तानातच थांबल्या.

तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर त्यांच्या विरोधातील आवाज असलेल्या सलीमा माझारी यांना बंधक बनवलं आहे. स्वत: अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्षही देश सोडून पळाले आहेत. अफगाणिस्तानच्या तीन महिला राज्यपालांपैकी सलीमा माझारी एक आहेत. अफगाणिस्तानातील अनेक प्रांत लढाईशिवाय तालिबानने जिंकले आहेत.

सलीमा यांनी त्यांच्या बाल्ख प्रांतातील चाहर किंत जिल्हा तालिबानच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी आपल्या बाजूने सर्व प्रयत्न केले. सलीमा माझारी यांनी चाहर किंत मधून राजकारणात ओळख बनवली. सलीमा माझारी यांनी तालिबान विरोधात जोरदाल लढा दिला.

मागच्या काही वर्षात सलीमा माझारी यांना अफगाणिस्तानातील महिला नेत्या म्हणून बरीच प्रसिद्ध मिळाली. त्यांचे कौतुक झाले. तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केल्यानंतर त्यांनी आपल्या लोकांबद्दल चिंता व्यक्त केली होती. गार्डियनशी त्यांनी संवाद साधला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT