ग्लोबल

Salman Rushdie: सलमान रश्दीवर हल्ला करणारा २४ वर्षीय हादी मातर कोण आहे?

सकाळ डिजिटल टीम

लेखक सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी हल्ला झाल्यानंतर काही क्षणांतच अधिकाऱ्यांनी लेखकावर वार करणाऱ्याला अटक केली. न्यूयॉर्क पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली, तो फेअरव्ह्यू, न्यू जर्सी येथील हादी मातर (२४) आहे.

न्यूयॉर्क पोलिसांचे मेजर यूजीन स्टॅनिझेव्स्की यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांना सांगितले की, संशयित हादी मातर याने रश्दीची ओळख झाल्यानंतर लगेचच मंचावर उडी मारली आणि वार केले.

न्यूयॉर्कच्या चौटौका संस्थेचे अध्यक्ष यांनी सांगितले की, जिथे रश्दी भाषण देणार होते, तिथे प्रवेश करण्यासाठी हल्लेखोराकडे पास होता.

ते पुढे म्हणाले की, तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. या हल्ल्यामागील हेतू निश्चित करण्यासाठी न्यूयॉर्क पोलीस एफबीआय आणि शेरीफच्या कार्यालयासोबत काम करत आहेत, असे स्टॅनिसझेव्स्की यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, याक्षणी असे गृहीत धरले जात आहे की, संशयित एकटा काम करत होता परंतु याची खात्री करण्यासाठी आधिकारी पुढील तपास करत आहेत.

भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी यांना शुक्रवारी वेस्टर्न न्यूयॉर्कच्या चौटौका इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यान देणार असताना वार करण्यात आले. सलमान रश्दी यांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याच्या जखमांवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्याच्या बुक एजंट अँड्र्यू वायली यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर रश्दीचा एक डोळा गमावू शकतात. वायली पुढे म्हणाले की, त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू आहेत.

रश्दी हे चौटाका इन्स्टिट्यूटमध्ये कलात्मक स्वातंत्र्यावर भाषण देणार होते, जिथे त्यांच्यावर हल्ला झाला आहे.

1)हादी मातरच्या सोशल मीडियाच्या प्राथमिक पुनरावलोकनात त्याला "शिया अतिरेकी" आणि इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड (IRGC) च्या कारणांबद्दल सहानुभूती असल्याचे दिसून आले.

2) Matar आणि IRGC यांच्यात कोणताही थेट संबंध नसला तरी, तपासकर्त्यांना हादी मातरशी संबंधित सेल फोन मेसेजिंग अॅपमध्ये 2020 मध्ये हत्या झालेल्या इराणी कमांडर कासिम सोलेमानीचे फोटो सापडले आहेत.

3) रश्दी कला कार्यक्रम आयोजित करणार्‍या न्यूयॉर्क शहराजवळील चौटौका संस्थेत भाषण देणार असताना हादी मातर यांनी मंचावर उडी मारली. या हल्ल्यात मुलाखतकार हेन्री रीझ यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे.

4) हादी मातर हा एकटाच काम करत होता, असा पोलिसांचा समज आहे. त्याचबरोबर, अधिकारी "विविध वस्तूंसाठी शोध वॉरंट मिळविण्याच्या प्रक्रियेत आहेत. घटनास्थळी एक बॅकपॅक आहे. तेथे इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील होती".

5) हादी मातर हे फेअरव्यू, न्यू जर्सी येथील आहे. अधिकारी अद्याप मटरचे राष्ट्रीयत्व आणि त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड, जर काही असतील तर तपासत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन बी काय आहे? अमित शाह काय म्हणाले जाणून घ्या...

IPL 2024: हैदराबादनेही प्लेऑफचं तिकीट केलं पक्कं! आता RCB vs CSK सामना लावणार चौथ्या संघाचा निकाल, पाहा कसं आहे समीकरण

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT