Sam Altman News Esakal
ग्लोबल

OpenAI:आल्टमन आता मायक्रोसॉफ्टच्या पंखांखाली! ‘ओपन एआय’मधून हकालपट्टीनंतर बॉकमन यांचे सॅम यांच्या पावलावर पाऊल

कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) या क्षेत्रात सुरू असलेल्या तीव्र स्पर्धेचे हे निदर्शक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळ डिजिटल टीम

ChatGPT: ‘चॅटजीपीटी’ची निर्मिती करणाऱ्या ‘ओपन एआय’ या कंपनीच्या संचालक मंडळाने या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम आल्टमन आणि सहसंस्थापक ग्रेन बॉकमन यांची हकालपट्टी केल्याच्या घटनेला केवळ दोनच दिवस उलटले असतानाच या दोघांनाही मायक्रोसॉफ्ट या कंपनीने आपल्या पंखाखाली घेतले आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) या क्षेत्रात सुरू असलेल्या तीव्र स्पर्धेचे हे निदर्शक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तंत्रज्ञान विश्‍वाची दिशा बदलण्याची क्षमता असलेल्या ‘चॅटजीपीटी’ या चॅटबॉटची निर्मिती केल्यानंतर ‘ओपनएआय’ ही कंपनी आणि तिचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम आल्टमन यांचे नाव या क्षेत्राशी निगडित सर्वांच्या तोंडी झाले होते. मात्र, कंपनीच्या संचालक मंडळाची शुक्रवारी (ता. १७) बैठक सुरु असतानाच आल्टमन आणि बॉकमन यांची अचानक हकालपट्टी झाल्याने सर्वांना धक्का बसला होता.

या घटनेला केवळ दोनच दिवस उलटले असतानाच मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नाडेला यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत आल्टमन आणि बॉकमन यांना आपल्या कंपनीत सामावून घेतल्याचे जाहीर केले. हे दोघेही आता मायक्रोसॉफ्टच्या ‘एआय’ संशोधन विभागाचे नेतृत्व करतील.(Latest Marathi News)

आल्टमन यांच्याऐवजी एमिट शिअर

सॅम आल्टमन यांना दूर केल्यानंतर ‘ओपन एआय’ कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी ‘ट्विच’ या कंपनीचे सहसंस्थापक एमिट शिअर यांची निवड केली आहे. सत्य नाडेला यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करताना ‘ओपन एआय’बरोबर असलेले व्यावसायिक संबंध कायम राहतील, असे सांगताना एमिट शिअर आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे स्पष्ट केले.

एलॉन मस्क यांच्याकडून थट्टा

सत्य नाडेला यांनी सॅम आल्टमन आणि ब्रॉकमन यांच्या नियुक्तीबद्दल केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना प्रसिद्ध उद्योगपती आणि ‘एक्स’चे प्रमुख एलॉन मस्क यांनी थट्टेखोर विधान केले आहे. ‘त्या दोघांना आता ‘टीम्स’चा वापर करावाच लागेल,’ अशी पोस्ट मस्क यांनी केली आहे. आल्टमन यांना ‘गुगल मीट’ या ॲपवर जॉइन होण्यास सांगून राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते.

ऑनलाइन बैठकीसाठी मायक्रोसॉफ्टचे याच पद्धतीचे ‘टीम्स’ नावाचे ॲप आहे. ‘ओपन एआय’ला मायक्रोसॉफ्टचे मोठे आर्थिक पाठबळ असतानाही आणि त्यांच्याकडे या कंपनीचे ४९ टक्के समभाग असतानाही ‘ओपन एआय’मध्ये ‘टीम्स’ऐवजी ‘गुगल मीट’चा वापर होत असल्यावरून मस्क यांनी ही थट्टा केल्याचे मानले जाते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जमीन-जागा विक्रीतील थांबणार फसवणूक! प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याने काढावा ‘सर्च रिपोर्ट’; बॅंक कर्जाचा बोजा असलेली प्रॉपर्टी विकता येत नाही, वाचा...

दुर्दैवी योगायोग! 'चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू'; वीस दिवसांपूर्वी बँकेच्या अधिकाऱ्याचा मृत्यू अन्..

Panchang 17 November 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या ‘E-kyc’ला निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ? उद्या संपणार 2 महिन्यांची मुदत; 1 कोटींवर महिलांनी अजूनही केली नाही ‘ई-केवायसी’

Liquid Gold For Winters: हिवाळ्यात राहाल निरोगी, सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' हेल्दी ड्रिंक

SCROLL FOR NEXT