Samosa for Breakfast
Samosa for Breakfast esakal
ग्लोबल

Samosa for Breakfast: इंग्रजांना कुकीज नाही तर चहासोबत आवडतोय आपला देसी समोसा, लंडनचा सर्व्हे

सकाळ डिजिटल टीम

Samosa for Breakfast : ब्रिटनमध्ये चहासोबत बॉरबॉन किंवा डायजेस्टीव्हज खाणे हे जणू त्यांच्या जीवनाचा भाग आहे. पण नवीन सर्वेक्षणात हे समोर आलं आहे की, तिथल्या तरुणांना गोड पदार्थांऐवजी नमकीन स्नॅक्स खाणे जास्त आवडू लागले आहेत. त्यामुळे या नव्या सर्वेक्षणानुसार तेथील तरुण समोसा आणि तत्सम स्नॅक्सला प्रादान्य देत आहेत.

युनायटेड किंगडम टी अँड इन्फ्युशन्स असोसिएशन (UKTIA) च्या हजार लोकांच्या सर्वेक्षणानुसार, १८ ते २९ वयोगटातील दहापैकी एकाला ग्रॅनोला बार हे चहाचे स्नॅक म्हणून आवडते. हे प्रमाण ज्येष्ठी नागरिकांंपेक्षा दुप्पट आहे. तर भारतीय नमकीन स्नॅक्स समोसा आवडण्याचं प्रमाण तरुणांमध्ये ८ ट्क्के आहे. पण ज्येष्ठ नागरिकांमध्ये एकही नाही.

ग्रॅनोला बार किंवा समोसा यात आत स्टफींग असते. ते आतून भरलेलं असतं, त्यामुळे ते खाऊन पेट भरल्याची जाणीव येत असल्याने या पदार्थांना पसंती मिळत असल्याचा निष्कर्ष यातून काढण्यात आला आहे. तरुणांना दाणेदार, मसालेदार पदार्थ आवडतात. त्यांनी प्रवासा दरम्यान काही अनुभव घेतलेले असतात, त्यातूनही ही आवड निर्माण झालेली असू शकते.

मिंटेल कंपनीच्या मार्केट रिसर्चमधून समोर आलं आहे की, १६ ते २४ वयोगटात चहा सोबत बिस्कीट खाण्याचं प्रमाण ५५ वर्षांवरील लोकांच्या तुलनेत निम्मे आहे. त्यांनी २००० चहा पिणाऱ्या लोकांसोबत हे सर्वेक्षण केले होते. त्यातून निदर्शनास आले आहे की, जर तरुणांमध्ये गरम पेयासोबत बिस्कीट खाण्याचं प्रमाण वाढलं नाही तर बिस्कीटांचं भवितव्य धोक्यात येऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT