Camel Beauty Contest esakal
ग्लोबल

सौदी अरेबियात मोठी कारवाई; 40 उंटांना काढलं सौंदर्य स्पर्धेतून बाहेर

सकाळ डिजिटल टीम

उंटांना वाळवंटातील जहाज म्हंटलं जातं, असे उंट सौदी अरेबियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात.

रियाद : सौदी अरेबिया सरकारनं (Government of Saudi Arabia) आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या उंट सौंदर्य स्पर्धेत (Camel Beauty Contest) 40 उंटांना बाहेर काढलंय. या उंटांना बोटॉक्सचं इंजेक्शन (Botox Injection) देण्यात आलं होतं. किंग अब्‍दुलअजीज उंट फेस्टिव्हल स्पर्धा जिंकणाऱ्या उंटाला तब्बल 6.6 करोड मिळणार आहेत. परंतु, हे पाहता उंट पाळणाऱ्या लोकांनी या निष्पाप प्राण्यांना बोटॉक्सचं इंजेक्शन दिलंय.

या उंट महोत्सवाला या महिन्यात सुरुवात झाली असून मालकांना त्यांचे उंट आणण्यासाठी आमंत्रित केलंय. या उंटांना वाळवंटातील जहाज म्हंटलं जातं, असे उंट सौदी अरेबियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. उंट अधिक आकर्षक दिसण्यासाठी या स्पर्धेत बोटॉक्स किंवा इतर कॉस्मेटिक वस्तूंचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. ज्युरी उंटाच्या डोक्याचा आकार, मान, ड्रेस, कुबड्याच्या आधारे विजेता घोषित करतात.

सौदी अरेबियाची राजधानी रियादच्या (Riyadh) ईशान्य भागात असलेल्या वाळवंटात हा उंट महोत्सव महिनाभर चालतो. सौदी अरेबियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेनं सांगितलं, की उंटांचं सौंदर्य कृत्रिमरित्या वाढवणाऱ्यांवर सरकारनं कारवाई केलीय. यासाठी विशेष आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या वर्षी अधिकाऱ्यांना असं आढळून आलं, की डझनभर उंट पाळणाऱ्यांनी मुद्दाम उंटांचे ओठ आणि नाक मोठे केले आहे.

एवढंच नाही, तर या उंट पाळणाऱ्यांनी प्राण्यांची शेपटी वाढवण्यासाठी हार्मोन्सचा वापर केलाय. याशिवाय, उंटांच्या डोक्यावर आणि ओठांवर बोटॉक्सचं इंजेक्शन दिलं जात होतं, जेणेकरून ते मोठे व्हावे. उंटांचं सौंदर्य वाढवण्यासाठी केली जाणारी फसवणूक पूर्णपणे थांबवण्यासाठी क्लब प्रयत्नशील असल्याचं या वृत्तात म्हटलंय. ज्यांनी हा गुन्हा केला आहे, त्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT