Pakistan pm Imran khan  imran khan
ग्लोबल

सुप्रीम कोर्टाचा इम्रान खान यांना दणका! संसद बरखास्तीचा निर्णय ठरवला असंवैधानिक

कोर्टाच्या निर्णयामुळं संसद कायम राहणार असून येत्या ९ एप्रिल रोजी अविश्वास प्रस्तावावर होणार मतदान

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं पंतप्रधान इम्रान खान यांना दणका दिला आहे. पाकिस्तानच्या संसद बरखास्तीचा डेप्युटी स्पीकरचा निर्णय कोर्टानं असंविधानिक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं पाकिस्तानची संसद कायम राहणार असून इम्रान खान यांना अविश्वास ठरावाला सामोरं जावं लागणार आहे. त्यानुसार, आता पाकिस्तानच्या स्पीकरकडून ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अविश्वास प्रस्तावावर मतदान घेतलं जाणार आहे. (SC of Pakistan reinstates National Assembly orders voting on no trust motion on April 9)

सुप्रीम कोर्टाची ही संपूर्ण सुनावणी डेप्युटी स्पीकरच्या त्या आदेशाविरोधात दाखल याचिकेवर झाली. ज्यामध्ये इम्रान खान सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. या निर्णयापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या कायदेशीर टीमसोबत महत्वाची बैठक घेतली होती. इम्रान खान यांनी म्हटलं होतं की, त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरिक-ए-इन्सान कोर्टाचा जो काही निर्णय असेल तो मान्य करेल. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर याचा निर्णय सुरक्षित ठेवण्यात आला होता.

सुप्रीम कोर्टानं पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारलं

सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधिशांनी पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारलं. त्यांनी म्हटलं की, सध्याच्या संकटकाळात आपण ९० दिवसांसाठी देशाला वाऱ्यावर सोडून दिलं.

निवडणूक आयोगानं केलं मोठ विधान

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं म्हटलं की, ऑक्टोबर २०२२ पूर्वी सार्वजनिक निवडणूक शक्य नाहीत. कारण ईसीपीला देशात स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणूक घेण्यासाठी सात महिन्यांचा कालावधी पाहिजे असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT