Covid-19 
ग्लोबल

वैज्ञानिकांना मोठे यश; covid-19 ला निष्क्रिय करणाऱ्या दोन जीवाणूंचा शोध

यूएनआय

बिजिंग - कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले आहे. दररोज कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे, तसेच यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. covid-19 वर कोणताही प्रभावी उपचार सापडला नसल्याने सर्व जग हतबल झाल्याचं दिसत आहे. मात्र, चीन आणि अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी एक चांगली बातमी दिली आहे. चीन आणि अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी संयुक्तपणे अशा जीवाणूचा शोध लावला आहे जो कोरोना व्हायरस, डेंगू आणि एचआयव्ही विषाणूंची शृंखला तोडून त्यांना निष्क्रिय करण्यात प्रभावी ठरत आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातल्या लढाईत वैज्ञानिकांना मोठं यश मिळाल्याचं बोललं जात आहे.

वैज्ञानिकांनी सुरुवातील एडिज इजिप्ती डासांच्या शरिरात सापडणाऱ्या एका जीवाणूचा शोध लावला. त्यानंतर या जीवाणूची विशिष्ठता जाणून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी याच्या जीनोमचा(DNA) अभ्यास केला. यातून त्यांना अशा दोन प्रथिनांची ओळख झाली जे डेंगू, एचआयव्ही आणि कोरोना व्हायरस सारख्या विषाणूमना निष्क्रिय करु शकता. वैज्ञानिकांनी याबाबतचं एक अभ्यास पत्र जारी केलं आहे. वैज्ञानिकांचे हे संशोधन भविष्यात मोठ्या प्रमाणात विषाणू विरोधी औषधांचा विकास करण्यासाठी सहाय्यभूत ठरु शकतं, असं ग्लोबल टाईम्सने अभ्यासाशी संबंधित पत्राच्या आधारावर म्हटलं आहे.

त्यिंगहुआ विश्वविद्यालय, अॅकॅडेमी ऑफ मिलिटरी मेडिकल साईन्स बिजिंग, रोग नियंत्रण केंद्र, शेंझेन आणि कनेक्टीकट विश्वविद्यालय, अमेरिका येथील संशोधकांचा या अभ्यासात समावेश होता.

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3.50 लाखांपर्यंत पोहोचली आहे. या महामारीला रोखने सर्व जगासमोर एक आव्हान बनले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी बनवण्यात येणारी प्रभावी लस बाजारात येण्यासाठी किमान 18 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. असे असताना चीन आणि अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केलेल्या या नव्या संशोधनामुळे कोरोना महामारीला रोखण्याची आशा वाटू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Raj Thackeray : गणेशोत्सवात दंगलींचा कट? ‘मुंबईत झलक दिसली’; राज ठाकरेंचा खळबळजनक इशारा

Vaibhav Sooryavanshi ची फटकेबाजी पाहून तिलक वर्मा वैतागला; १५ वर्षाच्या पोराला उगाच भिडला, अम्पायरची पळापळ... Video

Pune Bengaluru Highway: कारला आग लागली अन् महामार्ग ठप्प; आनेवाडीजवळ ५ किमी वाहनांच्या रांगा, अग्निशामक वाहनावर संताप

Marathi News Live Updates : पुण्यात शाळेत चोरी, चड्डी बनियन गँग सीसीटीव्हीत कैद

वयाच्या १५व्या वर्षी आई, १७व्या वर्षी वडील गेले... दोनदा बारावीची परीक्षा दिलेल्या पूजाने KBC मध्ये जिंकले १२.५ लाख, अमिताभही अवाक्

SCROLL FOR NEXT