ग्लोबल

दुसऱ्या लाटेमुळे दक्षिण आफ्रिकेतील किनारे बंद; रुग्ण संख्येत दुपटीने वाढ 

पीटीआय

जोहान्सबर्ग - कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने दक्षिण आफ्रिकेतील स्थिती बिघडत असल्याने अध्यक्ष सिरिल रामफोसा यांनी देशातील काही लोकप्रिय समुद्रकिनारे बंद करण्याचा निर्णय घेतला असून देशात लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशी सूचना दिली आहे. 

रामफोसा यांनी काल सायंकाळी दूरचित्रवाणीवरून जनतेला आवाहन करताना म्हटले, की गेल्या दोन आठवड्यात देशातील रुग्णांची संख्या वाढली आहे. जर तातडीने कारवाई न केल्यास दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक ठरु शकते. आफ्रिकेत गेल्या दहा दिवसात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या दररोज ८ हजाराहून अधिकांना कोरोनाची बाधा होत आहे. याच कालावधी कोरोनामुळे दररोज होणाऱ्या मृत्यूची संख्या सुमारे ५० टक्क्यांनी वाढली आहे. याप्रमाणे मृतांची संख्या १०० हून दीडशेवर पोचली आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक बाधा ही १५ ते १९ वयोगटातील मुलांना होत आहे. याबद्धल अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. जादा संख्येने आयोजित करण्यात येणारे सोहळे, पार्ट्या आणि प्रोटोकॉलचे पालन न करणे यामुळे कोरोनाची संख्या वाढत असल्याचे ते म्हणाले. अध्यक्षांच्या नव्या घोषणेनुसार ख्रिसमसच्या काळात आणि नवीन वर्षातही कोविड नियमांचे कडकरित्या पालन केले जाणार आहे. यात मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे या बरोबरच सार्वजनिक परिवहन, इमारत आणि दुकानदारांना सॅनेटायजेशन करणे बंधनकारक असणार आहे. गर्दीची ठिकाणे विशेषत: समुद्र किनारे आणि बाग बगिच्यांना १६ डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात निर्णय घेण्यात आला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दक्षिण आफ्रिकेतील नवे नियम 
उत्सव, सण, लाइव्ह म्युझिक शो, लाइव्ह कॉन्सर्ट, किनाऱ्यावर मद्यप्राशन करणे यावर बंदी 
परवानगी असलेले किनारे सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत सुरू राहणार 
रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत संचारबंदी लागू 
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उत्सवावरील निर्बंधाचा आढावा घेणार 

युवावर्ग मोठ्या संख्येने पार्ट्यांत सहभागी होत असून सर्रास मद्यपान करत आहेत. यादरम्यान ते सोशल डिस्टन्सिंग आणि सरकारच्या नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. 
ज्वेली मखिजे, आरोग्य मंत्री 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rooh Afza Supreme Court verdict: सरबतचा मुद्दा थेट सुप्रीम कोर्टात! रुह अफझा प्रकरणात असा निर्णय, ज्याने कर गणितच बदललं…

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ मार्च रोजी होण्याची शक्यता!

Narendra Modi Instagram Record : पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, डोनाल्ड ट्रम्प सह जगातील सर्वच नेत्यांना मागे टाकत केला नवा विक्रम

Satara Politics: सातारा झेडपी अध्यक्षपदासाठी काऊंटडाऊन सुरू; शासनाकडून २० मार्चपर्यंत मुदत, सत्तेच्या कोंडीमुळे वाढली उत्सुकता!

Satara News: यशवंत बँक गैरव्यवहारप्रकरणी शेखर चरेगावकरला अटक; दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT