Seema Haider Pakistan Sakal
ग्लोबल

Seema Haidar: भारतीय लष्करातील जवानांना सीमा हैदरने फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवल्या? ATSने सीमा हैदरला विचारले 'हे' 7 प्रश्न

Seema Haidar ATS Question Answer: सीमा हैदरला ATS ने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर तिनं कशापद्धतीने दिले?

सकाळ डिजिटल टीम

Seema Haidar Pakistan :पाकिस्तानच्या सिंध भागातून आपलं घर-दार विकून सीमा हैदर भारतात आली. त्यानंतर तिने तिच्या नवऱ्याबद्दल खूप सारे दावे केले की तो तिला मारहाण करत होता. पाकिस्तानमधील महिल्यांच्या स्थितीवर देखील तिने अनेक गोष्टी सांगितल्या.

सीमा हैदर आणि सचिनच्या लग्नाचे फोटो देखील समोर आले आहेत. या सर्व गोष्टींमध्ये नेपाळ केंद्रबिंदू ठरतोय. तोच नेपाळ देश, ज्या देशातून सीमा हैदर भारतात घुसली.

सीमा हैदरने दावा केला होता की नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरात तिने लग्न केलं, तर कधी सांगितंल की हॉटेलमध्ये तिने सचिनशी विवाहगाठ बांधली. भारतीय माध्यम संस्थानी नेपाळमधील मंदिरांमध्ये सीमा हैदरची चौकशी केली.

त्यांनी सीमा हैदरबद्दल सर्व माहिती मिळवली. ती कुठे राहीली, ती कशा पद्धतीने भारतात पोहोचली अशी सर्व माहिती माध्यमांनी गोळा केली.

सीमा आणि सचिनने दावा केला होता की दोघांनी काठमांडूमधील पशुपतीनाथ मंदिराशेजारी असलेल्या गुएश्वरी मंदिरात लग्न केलं होतं. माध्यमांनी या मंदिरातही या दोघांची चौकशी केली. मात्र, यांची कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही.

या ठिकाणी एक बोर्डही लावण्यात आला होता की या मंदिरात फक्त हिंदूना प्रवेश आहे.त्यानंतर हाही प्रश्न उपस्थित होतोय की मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी सीमाने आपली ओळख लपवली?

ATSने सीमा हैदरला ताब्यात घेतल्यावर तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. यामधील महत्वाच्या ७ प्रश्नांबद्दल तिने माध्यमांना उत्तरं दिली.

प्रश्न १- एटीएसने तुम्हाला काय विचारलं? अशी कोणती गोष्ट होती ज्यावर त्यांना सर्वात जास्त शंका होती?

सीमा-शंका तर त्यांना माझ्यावर होतीचं. जे कोही सत्य होते, ते सर्व मी त्यांना सांगितले. गावापासून कराची पर्यंत, कराचीपासून इथपर्यंतचं सर्व काही खरं खरं सांगितलंय.

प्रश्न २: खोली क्रमांक २०४...हॉटेल विनायक, इथेच थांबली होती ना नेपाळमध्ये, तुझ नाव बदलून का लिहिलं?

सीमा-हॉटेलवाले खोटं बोलतं आहे. ना त्यांनी आम्हाला आमचं नाव विचारलं , ना त्यांनी कोणत्याही प्रकारची सक्ती केली. ते स्वत:ला वाचवण्यासाठी आता हेचं सांगतील. ते लोक आमच्याकडून रोजचे ५०० नेपाळी रुपये घेतं होते.

प्रश्न ३:तुम्ही हॉटेलमध्ये तुमचं नाव प्रीती लिहिलं होतं का?

सीमा- नाही, मी कधीही प्रीती नाव नाही लिहिलं. माझं आणि माझ्या नवऱ्याचं नाव होतं. त्यांनी आमचं नाव कधी लिहिलंच नव्हतं, ना कधी आम्हाला आमचं नाव विचारण्यात आलं. माझ्या नवऱ्याने हॉटेलवाल्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की माझी बायकोही येणार आहे.

प्रश्न ४: विनायक हॉटेलच्या मॅनेजरने सांगितलं की तुम्हाला पब आणि बारमध्ये जायचं होतं?

सीमा- कधीच नाही. मी कधीही कुठेही जाण्याची गोष्ट नव्हती केली. घरी माझे मुलं देखील होते, तर मी असं कसं करु शकतं होते. आमच्याजवळ फक्त ७ दिवस होते आणि परत देखील जायचं होतं. तिकडं आम्ही हसतं खेळतं वेळ घालवला. सचिनला भेटायचं होतं म्हणून मी आले,तेव्हा मला नव्हतं माहिती की मी भारतात येईल.

प्रश्न ५: पशुपतीनाथ मंदिरात फक्त हिंदू लोकांचे लग्न लावले जातात, सीमा हैदरचं लग्न तिकडे कसं झालं?

सीमा-मी हिंदू आहे, मी मागच्या एका वर्षापासून हिंदू आहे. लोकं म्हणताय की मी इकडे आल्यापासून हिंदू बनण्याचं नाटक करतेय,पण मी जेव्हा पाकिस्तानात होते तेव्हाही मी मनाने हिंदूच होते.

मात्र, मी तिकडे सर्वांसमोर करु शकतं नव्हते. जर मी तिकडं कुणाला सांगितलं असतं की मला हिंदू बनायचंय तर मी जिवंत नसते वाचले.

प्रश्न ६:तुमचा भाऊ पाकिस्तानी सैन्य दलात काम करतो का?

सीमा-मी बऱ्याच वेळा सांगितलंय की, जेव्हा मी आणि सचिन भेटलो होतो तेव्हा माझा भाऊ मजूरी करत होता. तो १२ वीमध्ये शिकतं होता. त्याला कोणतही काम मिळतं नव्हतं. माझ्या वडीलांच्या मृत्यूनंतर तो त्यांच्या जागी कामाला लागला.

तो एक साधा शिपाई आहे. जितकं संशयास्पद नजरेने त्यांच्याकडे पाहिलं जातंय तितकी त्यांची ऐपत नाहीये. त्यांचा आणि माझा काहीही संबंध नाहीये, कारण मी विवाहित होते आणि वेगळं राहत होते. (Latest Marathi News)

प्रश्न ७:अशा देखील बातम्या समोर येत आहेत की भारतीय सेनेशी संबंधित लोकांना तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली ?

सीमा- अजिबात नाही. मी फेसबुक चालवतंच नाही. माझ्याजवळ फोन देखील नाहीये. माझ्या आयडीमध्ये ५ मित्र आहेत,ज्याच्यात सचिनचे मित्र आहेत. आता माझ्या आयडीवर लाखो रिक्वेस्ट येत आहेत.

माझ्या नावाने अनेक लोकांनी आयडी बनवली आहे. मी एकालाही रिक्वेस्ट पाठवली नाही. जर माझं अकाउंट दुसऱ्या कोणाच्या फोनमध्ये असेल त्यांनी रिक्वेस्ट पाठवली असेल. मी फक्त इंस्टाग्राम सुरु केलं होतं, जे फेसबुकशी लिंक होतं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: मंडणगडमधील महावितरणच्या जागेतील खैराची पुन्हा चोरी

SCROLL FOR NEXT