Viral Video esakal
ग्लोबल

Senegal: संसदेत चर्चेदरम्यान तुफान राडा, पुरूष खासदाराने महिलेच्या लगावली कानशिलात; पाहा Viral Video

दोन खासदारांच्या शाब्दिक चकमकीचे रुपांतर मारहाणीत झाले

रुपेश नामदास

बर्‍याच वेळा विविध देशांच्या संसदेतील वादविवाद इतका तीव्र होतो की काही वेळातच प्रचंड रौद्र रूप धारण करतो. अलीकडेच आफ्रिकन देश सेनेगलमध्ये दोन खासदारांच्या शाब्दिक चकमकीचे रुपांतर मारहाणीत झाले आणि एका पुरुष खासदाराने महिला खासदाराला मारहाण करण्यास सुरुवात केली, तेव्हा याचा आणखी एक प्रत्यय नुकताच पाहायला मिळाला.

हेही वाचा- First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

ही घटना सेनेगलच्या संसदेची आहे. याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. त्याचवेळी सत्ताधारी महिला खासदार अमी नादिये गनीबी आणि विरोधी पक्षाचे खासदार मसाता सांब यांच्यात जोरदार वादावादी झाली. काही धोरणांबाबत हा वाद सुरू झाला पण या चर्चेचे रूपांतर वादात झालं.

विरोधी पक्षाचे खासदार मसाता सांब यांनी पळत येवून थेट खासदार अमी नादिये गनीबी यांच्या कानाखाली चापट मारली त्यानंतर अमी नादिये गनीबी यांनी देखील मारायला सुरूवात केली. संतापलेल्या महिला खासदाराने त्यांच्यावर खुर्ची फेकली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक खासदार एकमेकांना भिडले.

एका मिडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती आणि त्यावेळी सेनेगलच्या संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. कामकाजादरम्यानच महिला खासदाराने अध्यक्षपदाच्या तिसऱ्या टर्मला विरोध करणाऱ्या नेत्यावर टीका केली, त्यानंतर गदारोळ सुरू झाला. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

SCROLL FOR NEXT