Khalil Jibran sakal
ग्लोबल

Peshavar Crime : वरिष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानमध्ये खून

पाकिस्तानमधील एका वरिष्ठ पत्रकाराचा काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला.

पीटीआय

पेशावर - पाकिस्तानमधील एका वरिष्ठ पत्रकाराचा काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला. खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात ही घटना घडली. खलिल जिब्रान असे या पत्रकाराचे नाव होते.

लंडीकोटल गावात ते एका मित्राबरोबर मोटारीतून घरी जात असताना गाडी रस्त्यात बंद पडली. गाडीची तपासणी करत असतानाच दुचाकीवरून आलेल्या काही जणांना त्यांना घेरले आणि गोळ्या मारल्या. या हल्ल्यात जिब्रान हे जागीच ठार झाले, तर त्यांचे सहकारी जखमी झाले. हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेले.

हा हल्ला दहशतवाद्यांनी केला असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जिब्रान यांना यापूर्वी काही वेळा दहशतवाद्यांकडून धमकी मिळाली होती. जिब्रान यांच्या खूनानंतर त्यांच्या गावात लोकांनी निदर्शने काढत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली. सोशल मीडियावरही अनेक जणांनी घटनेचा तीव्र निषेध केला. मागील महिन्यातही सिंध प्रांतात एका पत्रकारावर हल्ला झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Politics : गोकुळ दूध संघाकडून शौमिका महाडिकांचे आरोप खोडून काढले, प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती

कोण आहे राकेश किशोर? वय ७२, म्हणे,'पश्चाताप नाही, मी तुरुंगात जाणं चांगलं'

Latest Marathi News Live Update : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लवकरच होणार घोषणा, प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु

Nagpur Cough Syrup Death : विषारी कफ सिरपमुळे नागपुरात १८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, देशभरात मृतांचा आकडा १५ वर, प्रशासन अ‍ॅक्शनमोडवर...

ChatGPT Misuse : मित्राची वर्गातच हत्या कशी करायची? 'चॅटजीपीटी'ला विचारला प्रश्न, विद्यार्थ्याला खावी लागली तुरुंगाची हवा

SCROLL FOR NEXT