ग्लोबल

Sperm Donor : 48 मुलांचा बाप पण अजूनही आहे सिंगल, लग्नासाठी पोरी तयार नाहीत

जेव्हा मुलींना तो स्पर्म डोनर असल्याचे सांगतो तेव्हा त्याच्यापासून मुली दूर होत आहेत

सकाळ डिजिटल टीम

एका लेस्बियन जोडप्याच्या विनंतीवरून शुक्राणू दान सुरू करणाऱ्या व्यक्तीने थक्क करणारी माहिती दिली आहे. या तरुणाने त्याला ४८ मुले असल्याचे सांगितले असून येत्या काही काळात आणखी 10 ते 11 मुले जन्माला येऊ शकतात, असं स्पष्ट केलं आहे. मात्र हा तरुण त्याच्या लव्ह लाईफसंदर्भात चिंतेत आहे. जेव्हा मुलींना तो स्पर्म डोनर असल्याचे सांगतो तेव्हा त्याच्यापासून मुली दूर होत आहेत, अशी खंत त्याने सांगितले आहे.

या 48 मुलांच्या या बापाने लव्ह लाईफसंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. तो तरुण म्हणाला की, बहुतेक मुलींना जेव्हा तो स्पर्म डोनर आहे हे समजते तेव्हा अशा मुली त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवतात. दरम्यान, येत्या काळात त्या व्यक्तीची आणखी 10 मुले जन्माला येणार आहेत, असंही तो म्हणाला आहे.

काइल गॉर्डी असे या 31 वर्षीय तरुणाचे नाव असून तो अमेरिकेतील लॉस एंजेलिसचा रहिवासी आहे. काइलने आतापर्यंत एकटी आई, लेस्बियन जोडपी किंवा जे निरोगी शुक्राणूंअभावी मुलाला जन्म देऊ शकत नाही, अशा जोडप्यांना आपले शुक्राणू दान करत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना तो या मोफत सेवेबद्दल सांगत आहे. शुक्राणू बँकेत न जाता थेट महिलांना त्याचे शुक्राणू देत आहे. काइल म्हणाला की, अनकांना स्पर्म बँकचा वापर करणे मान्य नसते. कारण तिथे दान करणारा दाता अज्ञात असतो. त्यामुळे काही धोका उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे नवीन पालकांना त्यांच्या मुलाच्या 'खऱ्या बाप'संदर्भात कोणतीही कल्पना नसते, आणि हे बऱ्याचवेळा धोक्याचे ठरु शकते.

काईलन दिलेल्या शुक्राणूंमुळे गेल्या 8 वर्षांत 4 डझन म्हणजेच 60 महिला माता झाल्या आहेत. परंतु यामुळे काईल स्वतः रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही. त्याने सांगितले की, मी गेल्या 10 वर्षांपासून कुणालाही डेट केलेलं नाही. जेव्हा मी मुलींना शुक्राणू दाता असल्याचे सांगतो, तेव्हापासून त्यांना माझ्यात रस वाटत नाही, असाही खुलासा त्यानं केला आहे.

मुली भेटल्यानंतर बोलताना मला सांगतात की, तु महिलांना मदत करतोस हे समजू शकतो. परंतु मला अशा पुरुषासोबत राहायचे नाही, ज्याला इतर महिलांसोबत मुले आहेत. त्याने 8 वर्षांपूर्वी एका लेस्बियन जोडप्याच्या विनंतीवरून स्पर्म डोनेशन सुरू केले होते. यानंतर, विनंतीवरून त्याने वेगवेगळ्या महिलांना शुक्राणू दान करण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT