Vaccination Sakal
ग्लोबल

युरोपियन युनियनमधील सात देशांमध्ये कोव्हिशिल्डला मान्यता

भारताच्या ठाम भूमिकेनंतर EU नरमलं

दीनानाथ परब

मुंबई: कोव्हिशिल्ड लसीला (covishield vaccine) स्वित्झर्लंडसह युरोपियन युनियनमधील सात देशांनी मान्यता दिली आहे. कोव्हिशिल्ड लसीला मान्यता नसल्यामुळे प्रवासावर मर्यादा येत होत्या. भारताने सरकारने या विषयावर ठोस भूमिका घेतली होती. भारतान सरकारने युरोपीय समुदायास (European Union) कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या लशींचा हरित पारपत्रयोजनेत (व्हॅक्सीन पासपोर्ट)समावेश करून त्यांना मंजुरी देण्याची अधिकृत विनंती केली आहे. (seven EU nations Switzerland approve Covishield vaccine amid travel pass row)

जोपर्यंत भारतीय लशींना व्हॅक्सीन पासपोर्टमध्ये जागा दिली जात नाही, तोपर्यंत युरोपीयन समुदायाच्या डिजिटल कोविड प्रमाणपत्राला मान्यता दिली जाणार नाही, असेही भारताने ठणकावलं होतं. त्यानंतर आता कोव्हिशिल्ड लसीला युरोपियन युनियनमधल्या सात देशांनी मान्यता दिली आहे. यात ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड आणि स्पेन या देशांचा समावेश आहे.

कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे डोस घेतलेल्यांचा ग्रीन पासमध्ये समावेश केल्यास प्रवासात मुभा मिळू शकते, शिवाय विलगीकरणाचा कालावधीही कमी होतो. भारताने युरोपीन महासंघातील 27 सदस्य राष्ट्रांनी Interchangeable पॉलिसाचा वापर करण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच कोविन पोर्टलच्या (Cowin portal) माध्यमातून लसीकरण प्रमाणपत्र स्वीकार करावे, अशी विनंती भारताने युरोपीन महासंघाला केली आहे. दरम्यान, युरोपीय वैद्यक संस्थेकडून कोविशिल्ड या लशीला महिनाभरात मान्यता मिळेल, असा विश्वास पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT