Severe Floods in China Leave Over 106 Dead or Missing 
ग्लोबल

चीनवर आता नवं संकट; तब्बल १०६ जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था

यिचांग - चीनमध्ये कोरोनानंतर आता पावसाने आणि पुराने थैमान घातले आहे. चीनच्या यिचांग या भागात झालेल्या पावसाने आतापर्यंत तब्बल १०६ जणांचा बळी घेतला आहे. चीनच्या यिचांग शहरात पावसामुळे घाणेरडे पाणी लोकांच्या कमरेपर्यंत आले होते. येथे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने लोकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या भागात लोकांच्या मोठ्या प्रमाणावर गाड्यादेखील पाण्यात अडकल्या आहेत. रस्त्यांना अक्षरशः कॅनलचे स्वरूप आले आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले शहर यंगशुओमध्ये ढगफुटीची घटनाही घडली आहे. या पावसामुळे दक्षिण चीनमध्ये मोठे नुकसान झाले आहे. येथे तब्बल १५ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. या भागात कोसळणाऱ्या पावसाचा सर्वधिक फटका हुबेई प्रांताला बसला आहे. या पूर्वी येथे कोरोना व्हायरसने हुबेई प्रांतात थैमान घातले होते. आता या प्रांताला पावसाच्या प्रकोपाला सामोरे जावे लागत आहे. येथे एवढे पाणी साचले आहे, की लोकांना आपले घर-दार सोडून सुरक्षित स्थळी जावे लागत आहे.
------------  
उत्तरप्रदेश, बिहारमध्ये एकाच दिवसात वीज कोसळून तब्बल ४३ जणांचा मृत्यू
------------
जून महिन्यात मुसळधार पावसामुळे चीनच्या नद्यांची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढते. यामुळे येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. खरेतर येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी चीन सरकार आधीच प्रयत्न करत असते. मात्र, यावेळी कोरोना व्हायरसमुळे तयारी करायला सरकारला वेळ मिळाला नाही. यामुळे येथील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. येथील हवामान खात्याने शनिवारपासून चीनच्या नैऋत्य भागात आणखी मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

कोरोना व्हायरसमुळे चीनचा हा प्रांत बरेच दिवस बंद होता. आता काही दिवसांपासून येथील वातावरण पूर्व पदावर येत असतानाच पावसाने कहर केला आहे.अद्याप कोरोना व्हायरसच्या दहशतीतून येथील लोक पूर्णपणे बाहेरही पडलेले नव्हते. तोच पावसाने येथील परिस्थिती अणखीनच भयावह केली आहे. येथील कोल सांगतात, की आम्ही आधीच कोरोनामुळे त्रस्त होतो. त्यातच आता पावसानेही भर घातली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT