Israel-Hamas 
ग्लोबल

Israel-Hamas War: हमासने नग्न अवस्थेत गाझामध्ये फिरवलेल्या त्या तरुणीचा मृतदेह सापडला!

कार्तिक पुजारी

तेल अविव- हमासकडून अपहरण झालेल्या आणि नग्न धिंड काढलेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. इस्राइलचा परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्राइलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त इस्राइली लोकांचा मृत्यू झाला आहे. दाव्यानुसार, हमासच्या दहशतवाद्यांनी २०० पेक्षा जास्त इस्राइली नागरिकांचे अपहरण केले आहे.

शानी लूक हिच्या आईने माहिती दिली की, त्यांच्या मुलीचे हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. इस्राइलच्या लष्कराने माहिती दिलीये की त्यांची मुलगी आता या जगात नाही. शानी लूक हिच्या बहिणीने देखील या माहितीची पुष्टी केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर म्हटलं की, माझ्या बहिणीच्या मृत्यूची बातमी देताना खूप दु:ख होत आहे. पार्टीमधून तिचे अपहरण करण्यात आले होते.इस्राइलने शानी लूक हिचा मृतदेख सापडला असल्याचं म्हटलं आहे.

शानी लूक ७ ऑक्टोबरपासून होती बेपत्ता

इस्रालच्या दक्षिण भागात आयोजित करण्यात आलेल्या सुपरनोव्हा म्युझिक फेस्टिवलनंतर शानी लूक बेपत्ता झाली होती. हमासच्या दहशतवाद्यांनी तिचे अपहरण केले होते. हल्ल्यानंतर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये तिला एका ट्रकमध्ये बांधून ठेवल्याचं दिसलं होतं. त्यानंतर तिचं काय झालं याची माहिती मिळू शकली नव्हती.

शानी लूक हिच्या कुटुंबियांना माहिती मिळाली होती की, ती गंभीर जखमी आहे आणि तिच्यावर गाझा पट्टीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. शानी लूक हिच्याकडे इस्राइल आणि जर्मनी असं दोन देशाचं नागरिकत्व आहे. लूक ही जास्त करुन इस्राइलमध्येच राहायची. तिची आई मुळची जर्मनीची आहे.

दरम्यान, इस्राइल-हमास संघर्ष दुसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचलं आहे. इस्राइलच्या लष्कराने गाझावर जमिनी कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे संघर्ष अधिक वाढला आहे. एका रिपोर्टनुसार, आतापर्यंत गाझापट्टीमध्ये ८ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्तास हे युद्ध थांबण्याची चिन्ह नाहीत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT