Hamas-Israel War Esakal
ग्लोबल

Hamas-Israel War: 'मला वाटतंय शरद पवार गाझामध्ये सुप्रिया सुळेंना लढण्यासाठी पाठवतील...', भाजप मुख्यमंत्र्याचा खोचक टोला

शरद पवारांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिल्यानंतर आसामच्या मुख्यमंत्र्याचा खोचक टोला

अंकिता खाणे (Ankita Khane)

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरूच आहे. दरम्यान या युद्धाबाबत भारतीय राजकीय पक्षांची वेगवेगळी मते आहेत. एकीकडे भाजप इस्रायलच्या पाठीशी उभा आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष पॅलेस्टाईनच्या पाठीशी आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ विधान केलं होते, ज्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, शरद पवार त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना गाझाला पाठवतील. हिमंता बिस्वा सरमा यांना शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न केला असता ते म्हणाले की, 'मला वाटते शरद पवार सुप्रिया मॅडमला हमासला लढण्यासाठी पाठवतील'.

हिमंता बिस्वा यांचे हे वक्तव्य शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर काही दिवसांनी आले आहे, जेव्हा ते म्हणाले होते की, भारताचे पूर्वीचे पंतप्रधानही पॅलेस्टाईनच्या पाठीशी ठामपणे उभे होते. पंतप्रधान मोदींनी इस्रायलला दिलेला पाठिंबा 'दुर्दैवी' असल्याचे सांगून राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले की, त्यांनी खऱ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले.

काय म्हणाले शरद पवार?

"संपूर्ण जमीन पॅलेस्टाईनची आहे आणि इस्रायलने त्यांच्या जमिनीवर कब्जा केला आहे. ती जागा, जमीन आणि घरे, सर्व काही पॅलेस्टाईनच्या मालकीचे होते आणि नंतर इस्रायलने त्यावर कब्जा केला. इस्रायल हा बाहेरचा देश आहे आणि ही जमीन मूळची पॅलेस्टाईनची होती. जे मूळचे इस्रायलचे रहिवासी आहेत त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस उभी असल्याचे ते म्हणाले होते.

पवार यांच्या वक्तव्याचा भाजपने केला होता निषेध

शरद पवारांच्या या वक्तव्याचा भाजपकडूनही निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री हिमंता यांच्या आधी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले होते की, शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याबाबत भारताच्या भूमिकेवर "मूर्ख विधाने" करतात तेव्हा ते खूप त्रासदायक असते.

केंद्रीय मंत्री गोयल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, "पवारजी त्याच सरकारचे भाग होते ज्यांनी बाटला हाऊस चकमकीत अश्रू ढाळले आणि जेव्हा भारतीय भूमीवर दहशतवादी हल्ले झाले तेव्हा झोपले होते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT