Shinzo Abe murder case Japan PM Fumio Kishida statement on Unification Church  sakal
ग्लोबल

किशिदांनी तोडले वादग्रस्त चर्चबरोबरील संबंध

माफीही मागितली; आबेंच्या हत्येनंतर झालेल्या टीकेनंतर निर्णय

सकाळ वृत्तसेवा

टोकियो : जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्या हत्येनंतर जनतेच्या टीकेचा भडिमार झालेल्या ‘युनिफिकेशन चर्च’ बरोबरील संबंध सत्ताधारी पक्ष तोडून टाकत असल्याचे जपानचे पंतप्रधान फ्युमिओ किशिदा यांनी आज जाहीर केले. तसेच, लोकांच्या विश्‍वासाला धक्का पोहोचविल्याबद्दल त्यांनी माफीही मागितली. जुलैमध्ये एका प्रचारसभेत शिंझो आबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आबे हे ‘युनिफिकेशन चर्च’चे समर्थक असल्यानेच त्यांची हत्या केल्याचे तेत्सुया यामागानी या हल्लेखोराने चौकशीदरम्यान कबूल केले होते. त्यानंतर या चर्चच्या अनेक गैरप्रकारांबाबत उघड बोलले जाऊन टीका होत होती. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांचे या चर्चबरोबर निकटचे संबंध आहेत.

यातील बहुतेक सदस्य आबे यांचे समर्थक आहेत. हल्लेखोर यामागानी याची आईदेखील चर्चची सदस्या होती आणि तिने या चर्चला दिलेल्या मोठ्या देणग्यांमुळेच आपले आयुष्य उद्ध्वस्त झाले, असे यामागानी याने पोलिसांना सांगितले होते. आज चर्चबरोबरचे संबंध तोडताना किशिदा म्हणाले,‘धार्मिक गटांनी कायद्याचे पालन करायलाच हवे. समाजात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या गटांपासून राजकीय नेत्यांना सावध राहणे आवश्‍यक आहे. जनतेच्या संशयाला आणि काळजीला कारणीभूत ठरल्याबद्दल लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रमुख म्हणून मी सर्वांची माफी मागतो.’

युनिफिकेशन चर्चवरील आरोप

युनिफिकेशन चर्चची स्थापना दक्षिण कोरियात १९५४ मध्ये झाली होती. त्यानंतर दशकभरातच या चर्चने जपानमध्ये विस्तार केला. या चर्चने साम्यवादी विचारांना विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांशी जवळीक केली. शिंझो आबे यांचे आजोबा आणि माजी पंतप्रधान नोबुसुके किशी यांनीच टोकियोमध्ये या चर्चचा राजकीय प्रभाव वाढण्यास मदत केली होती. १९८० नंतर या चर्चने केलेल्या भरती प्रक्रियेवर, धार्मिक वस्तूंच्या विक्रीवर आणि स्वीकारलेल्या देणग्यांवर अनेकांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली होती. अनुयायांना मोठ्या प्रमाणावर देणग्या देण्यास चर्च भाग पाडत असल्याने त्या अनुयायाचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोपही चर्चवर झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: दसऱ्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; चांदीत वाढ कायम, काय आहे आजचा भाव?

गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूचं गुढं उलगडलं, स्कुबा डायव्हिंग नाही तर हे होतं मोठं मृत्यूचं कारण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा ‘Azad Kashmir’चा नारा; माफी मागायची सोडून आपलीच टिमकी मिरवतेय...

'तुम्हाला I Love Modi म्हटलं तर चालतं, मग I Love Mohammad म्हटलं तर वाद का?' ओवेसींचा थेट सवाल, मोदींसह RSS वर जोरदार निशाणा

Kantara Chapter 1 Box Office : 'कांतारा चॅप्टर 1' वादळ! पहिल्या दिवशी केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई, छावा-सैयारासह 10 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT