ग्लोबल

पत्नीवरचा राग; पठ्ठ्याने लावली तब्बल ४ कोटींच्या घराला आग

रागाच्या भरात त्याने जाळलं ४ कोटींचं घर

शर्वरी जोशी

लग्न झाल्यानंतर पतीच्या संपत्तीमध्ये पत्नीचा अर्धा वाटा असतो हे साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, आपल्या संपत्तीमधील १ रुपयाही पत्नीला मिळू नये यासाठी या एका पठ्ठ्याने चक्क ४ कोटींच्या घराला आग लावली आहे. हा प्रकार युकेमध्ये घडला असून सोशल मीडियावर सध्या या व्यक्तीची चर्चा रंगली आहे. (shocking-news-this-is-why-man-burns-down-his-own-house-news-from-uk)

घर जाळल्यामुळे चर्चेत आलेल्या व्यक्तीचं नाव John McCorry असं असून ते कॅनफोर्डमध्ये राहतात.विशेष म्हणजे John यांच्या या घराची विक्री झाली होती आणि तीन दिवसांमध्ये नवे घरमालक घराचा ताबा घेणार होते. मात्र, त्यापूर्वीच John यांनी पत्नीवर असलेल्या रागाच्या भरात घराला आग लावली.

पत्नीला द्यावा लागला असता वाटा

John McCorry आणि त्यांची पत्नी हिलेरी यांच्यात मतभेद असल्यामुळे ते स्वतंत्र राहत होते. मात्र, आपल्या घरातील अर्धा हिस्सा पत्नीला द्यावा लागेल किंवा तिच्यामुळे आपल्याला घर सोडून जावं लागेल या विचाराने त्यांनी घराला आग लावली. घर जळून गेल्यानंतर वाटा देण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणून त्यांनी घर जाळलं.

नशेत जाळलं घर

John यांनी १७ जून रोजी दारुच्या नशेत घराला आग लावली. विशेष म्हणजे त्यांनी घराचा कोणताही विमा उतरवला नव्हता. त्यामुळे हे कृत्य त्यांना महागात पडलं आहे. "मी जाणूनबुजून माझ्या घराला आग लावलेली नाही. मी नशेत होतो. त्यातच माझ्याच विचारांमध्ये होतो त्यामुळे माझ्याकडून हे सारं घडलं. मला घटस्फोट घ्यायचा नव्हता. मला माझ्या घरातून बाहेर जायचं नव्हतं. मी तिच्यासाठीच येथे आलो होतो. मी रागात नव्हतो तर मी अप्सेट होतो", असं John ने सांगितलं.

"John पासून विभक्त झाल्यामुळे मी खरंच फार आनंद आहे. तो रागात होता त्यामुळेच मी त्याला सोडून गेले होते. कदाचित मला नुकसान पोहोचावं म्हणूनच त्याने घराला आग लावली असेल", असं हिलेरी म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT