Washington Police esakal
ग्लोबल

अमेरिका पुन्हा हादरलं; नाईट क्लबमध्ये गोळीबार, 2 ठार तर 4 जण गंभीर जखमी

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेत गोळीबाराच्या वाढत्या घटनांमुळं संपूर्ण देश चिंतेत आहे.

एकीकडं अमेरिकेत (America) गोळीबाराच्या वाढत्या घटनांमुळं संपूर्ण देश चिंतेत आहे, तर दुसरीकडं या घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीयत. शिकागोजवळील गॅरी परिसरात असलेल्या इंडियाना नाईट क्लबमध्ये (Indiana Nightclub) रविवारी गोळीबाराची घटना उघडकीस आली. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झालाय. तर, 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी सांगितलं की, क्लबमध्ये प्रवेश करताच त्यांना 2 लोक बेशुद्ध पडलेले आढळले. दोघंही गोळीबाराचे बळी ठरले होते. यामध्ये एक 34 वर्षीय पुरुष आणि 26 वर्षीय महिलेचा समावेश होता. दोघांनाही रुग्णालयात नेलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलंय. या गोळीबारात जखमी झालेल्या चार जणांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी अपघातातील मृतांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाहीय.

मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर झालेल्या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू

चार दिवसांपूर्वी म्हणजेच, 9 जून रोजी उत्तर मेरीलँडमध्ये एका बंदुकधारी व्यक्तीनं मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर गोळीबार केला होता. या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला होता. वॉशिंग्टन पोलिसांनी (Washington Police) दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराला अटक करण्यात आलीय. पोलिसांसोबत झालेल्या क्रॉस फायरिंगमध्ये आरोपी जखमी झाला होता, त्याला नंतर ताब्यात घेण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालिकेकडून ना भाडे, ना मोबदला… तरीही म्हाडाने भरला 26 लाखांचा मालमत्ता कर, नेमकं प्रकरण काय?

Chandoli Sanctuary Protest : जीव मुठीत घेऊन जगायचं कसं? सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गावांमध्ये बिबट्याची दहशत; शेतकऱ्यांचा वनविभागाला 21 दिवसांचा अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: संभाजीनगर नागपूर दृतगती महामार्गावर ट्रकला अपघात, चालक ठार

मुंबई इंडियन्ससाठी Vaibhav Sooryavanshi, तुमची साथ सोडू शकतो; राजस्थान रॉयल्स, 'पोस्टर बॉय'वर लक्ष ठेवा, ३० कोटी...

न्यायातील प्रतारणेबाबत कनिष्ठ न्यायालय बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT