Kansas Shooting  esakal
ग्लोबल

Kansas Shooting : क्रीडा स्पर्धेदरम्यान कॅन्सस शहरात गोळीबार; दोघांचा मृत्यू, 8 मुलांसह 22 जण जखमी

अमेरिकेतील कॅन्सस शहरात (Kansas City America) झालेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झालाय.

सकाळ डिजिटल टीम

याआधी गेल्या वर्षी डेन्व्हर शहरात एमबीए चॅम्पियनशिपमध्येही गोळीबार झाला होता. त्यातही अनेक लोक जखमी झाले होते.

Shooting Kansas City : अमेरिकेतील कॅन्सस शहरात (Kansas City America) झालेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झालाय. या घटनेत आठ मुलांसह अन्य 22 जण जखमी झाल्याची माहिती आहे. गोळीबाराची ही घटना ‘सिटी चीफ्स सुपर बाउल’ या क्रीडा स्पर्धेदरम्यान घडलीये.

कॅन्सस शहराचे पोलिस प्रमुख स्टेसी ग्रेव्हज यांनी सांगितलं की, या दुर्घटनेनंतर तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. येथे क्रीडा स्पर्धेदरम्यान सहभागी असलेल्या काही लोकांनी संशयिताला अटक करण्यात मदत केल्याची माहितीही त्यांना यावेळी दिली.

ग्रेव्हज पुढे म्हणाले, आज जे काही घडलं त्यामुळं मी खूप दु:खी झालो आहे. इथं आलेल्या लोकांना किमान सुरक्षित वातावरणाची अपेक्षा होती. मात्र, तसं घडलं नाही. दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कोणतीही माहिती तात्काळ सार्वजनिक केली नाहीये.

या गोळीबारामागचा हेतू काय होता हेही पोलिसांनी सांगितलेलं नाहीये. याआधी गेल्या वर्षी डेन्व्हर शहरात एमबीए चॅम्पियनशिपमध्येही गोळीबार झाला होता. त्यातही अनेक लोक जखमी झाले होते. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कच्या सबवे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरही गोळीबार झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : रेल्वे तिकीट तपासणीला आता बॉडी कॅमेऱ्याची नजर! १५ बॉडी कॅमेरे, ३० खास जॅकेट; एसी लोकलमध्ये विशेष देखरेख

‘गौतम गंभीर चांगला माणूस आहे, पण कोच म्हणून...’; हरभजन सिंगच्या या वक्तव्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण; नेमकं काय म्हणाला?

Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान

Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

Koyana Dam Water Release : कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT